Asia Cup 2022 : फायनलआधी स्पॉट फिक्सिंगमधल्या खेळाडूनं गुपित केलं उघड,"पाकिस्तान संघ..."

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडलेल्या खेळाडूने Asia Cup final आधी मोठं वक्तव्य

Updated: Sep 11, 2022, 02:14 PM IST
Asia Cup 2022 : फायनलआधी स्पॉट फिक्सिंगमधल्या खेळाडूनं गुपित केलं उघड,"पाकिस्तान संघ..." title=

Salman butt Pakistan Team : आज आशिया कपचा अंतिम सामना पाकिस्तान आणि श्रालंकेमध्ये रंगणार आहे. पराभवाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान संघ मोठ्या तयारीनिशी उतरणार असेल. मात्र सामन्याआधी पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बटने पाकिस्तानच्या संघाचं मोठं गुपित उघड केलं आहे. 

पाकिस्तानची मधली फळी या स्पर्धेमध्ये प्रभावी कामगिरी करू शकलेली नाही. फलंदाज गुगली खेळताना बाद होत आहेत श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाची गुगली खेळताना गडबडल्याचं सलमान बटने सांगितलं. सलमान बट त्याच्या यूट्यूब चॅनलवर याबाबत बोलत होता. यावेळी त्याने पाकिस्तानच्या मधल्या फळीच्या फलंदाजांबाबतही चिंता व्यक्त केली.

या स्पर्धेमध्ये कर्णधार बाबर आझमला आपली छाप पाडता आली नाही. ज्यावेळी मोहम्मद रिझवान बाद होतो त्यावेळी पाकिस्तानची मधली फळी धावांसाठी संघर्ष करत असल्याचं दिसून येते. मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी एकेरी आणि दुहेरी धावा केल्या पाहिजेत. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तुम्ही विकेट गमावू शकता. त्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजीबाबत चिंता वाटत असल्याचं बट म्हणाला. 

दरम्यान, मिडल ऑर्डरला कधी मोहम्मद नवाजला तर कधी शादाबला फलंदाजासाठी पाठवलं जातं. त्यांना वाटतं त्यांची भूमिका ही शेवटच्या दोन ते तीन षटकांसाठी आहे. त्यांनी ही मानसिकता बदलायला हवी कारण भविष्यात याचा संघाला मोठा फटका बसू शकतो, असंही बट म्हणाला.