PAK vs ENG : इंग्लंड आणि पाकिस्तान (PAK vs ENG) यांच्यामध्ये मुल्तानमध्ये दुसरा टेस्ट (PAK vs ENG Second test) सामना खेळवला जातोय. या सामन्यामध्ये अबरार अहमदची (Abrar Ahmed) जादू पहायला मिळालीये. मुख्य म्हणजे अबरार यांचा हा डेब्यू सामना आहे. अबरारने त्याच्या गोलंदाजीच्या जादूने इंग्रजी खेळाडूंची (England team) चांगली दाणादाण उडवली आहे. सुरुवातीच्याच सामन्यात त्याने 7 विकेट्स (7 Wickets) घेतलेत. पहिल्याच सामन्यात पहिल्या दिवशी जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, विल जॅक्स आणि बेन स्टोक्स यांना अबरारने माघारी धाडलंय.
उत्तम गोलंदाजी करत उजव्या हाताचा लेगस्पिनर अबरार अहमदच्या नावावर एक मोठा विक्रम केलाय. 24 वर्षांच्या अबरारने टेस्टमध्ये पदार्पण करत पाचहून अधिक बळी घेणारा तो पाकिस्तानचा केवळ 13वा गोलंदाज ठरलाय. मुलतानमध्ये 16 वर्षांनंतर टेस्ट सामन्याचे आयोजन केलं गेलं असून अबरार अहमदने हा सामना पाकिस्तानसाठी संस्मरणीय ठरवलाय.
अबरार अहमदने डेब्यू इनिंगमध्ये 114 रन्स देत 7 विकेट्स काढलेत. तर बाकीचे 3 विकेट्स जाहिद महमूदने पटकावलेत. अबरारच्या या घातक गोलंदाजीपुढे इंग्लंडची टीम 281 रन्सवर ऑलआऊट झाली. पाहिलं तर अबरार अहमद डेब्यू इनिंगमध्ये 7 विकेट्स घेणारा जगातील 14 वा आणि पाकिस्तानचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी केवळ मोहम्मद नझीर आणि मोहम्मद जाहिद यांनाच ही कामगिरी जमली होती.
पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये रावळपिंडी पीचवरून बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता मुल्तान टेस्ट सामन्यामध्ये स्पिनर्सला खूप मदत मिळतेय. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या सामन्याची सुरुवात करपूर्वी विकेट्सची माहिती दिली होती. यावेळी त्याने म्हटलं होतं की, या पिचवर बॉल टर्न होण्याची आशा करतो, आणि आता तसंच झालंय.
अबरार अहमदने फेब्रुवारी 2017 मध्ये पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंगसाठी टी-20 क्रिकेट खेळलं होतं. त्यानंतर त्याने नोव्हेंबर 2020 मध्ये कायद-ए-आजम ट्रॉफीमध्ये सिंधसाठी खेळताना प्रथम श्रेणीत पदार्पण केलं होतं. अबरारने नोव्हेंबर 2021 मध्ये श्रीलंका-अ क्रिकेट टीमविरुद्ध लिस्ट ए मध्ये डेब्यू केलेला.
इंग्लंडची टीम सध्या तीन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये 1-0 ने आघाडीवर आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या टीमने रावळपिंडी टेस्ट सामना 74 रन्सने जिंकला होता. त्या सामन्यात, दोन्ही टीमन्सने भरपूर रन्स केलेले. पाच दिवसांच्या या सामन्यात एकूण 1768 रन्स करण्यात आले होते.