पाकिस्तानी खेळाडूचा स्टेडियमध्ये तुफान डान्स, VIDEO होतोय व्हायरल

पाकिस्तानच्या 'या' खेळाडूचा मैदानावरील डान्स पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही, पाहा VIDEO

Updated: Jul 17, 2022, 02:43 PM IST
 पाकिस्तानी खेळाडूचा स्टेडियमध्ये तुफान डान्स, VIDEO होतोय व्हायरल  title=

कराची : पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर पाकिस्तान श्रीलंकेसोबत दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉलमध्ये खेळवला जात आहे. या पहिल्या सामन्य़ा दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची तुफान चर्चा रंगली आहे.  

व्हिडिओत काय?
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील गॉल येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात हसन अली श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान सीमारेषेवर फिल्डिंग करत होता. यादरम्यान तो विचित्र पद्धतीने डान्स करताना दिसला. हसन अली त्याचा सहकारी खेळाडू हरिस रौफ हा डान्स करताना दिसला. हसनचा हा अजब डान्स पाहून रौफलाही हसू आवरता आले नाही.

मॅच दरम्यानचा हसन अलीचा हा डान्स पाहून समालोचकही थक्क झाले. ही संपूर्ण घटना गॉल कसोटीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 16 जुलैला घडली आहे. दरम्यान मॅच संपल्यानंतर हसन अलीने सांगितले की, मला अशाप्रकारे डान्स करण्यात मजा येते. तो त्याच्या दिनचर्येचा भाग असल्याचे त्याने सांगितले. 

धावफलक 
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान श्रीलंकेचा डाव 222 धावांवर आटोपला. संघाकडून दिनेश चंडिमलने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. तर कर्णधार दिमुथ करुणारत्नेला केवळ एक धाव करता आली. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने 4 आणि हसन अलीने 2 बळी घेतले.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तान संघाने 100 धावांच्या आत 7 विकेट गमावल्या आहेत. तर कॅप्टन बाबर आझम एकटाच लढताना दिसत आहे. श्रीलंकेकडून लेगस्पिनर प्रभात जयसूर्याने सर्वाधिक 5 बळी घेतले. हा सामना संध्या रंजक स्थितीत पोहोचलाय.