नवी दिल्ली : काश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिकला (Yasin Malik) फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दिल्लीच्या NIA कोर्टाने यासिन मलिकला दोषी ठरवलं आहे. दहशतवादी कारवायासाठी टेरर फंडिंगप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलंय. आज यासिन मलिकने स्वतःचा युक्तीवाद स्वतःच केला. यासिन मलिकच्या शिक्षेवर पाटियाला हाऊल कोर्टात सुनावणी सुरु आहे. यासिनला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी तीव्र मागणी करण्यात येत असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे. (pakistan former cricketer shahid afridi controversial tweet on india over to yasin malik matter)
आफ्रिदीने ट्विट करत भारतावर गंभीर आरोप केले आहेत. तर यासिनची पाठराखण केली आहे. तसेच त्याने नेहमीप्रमाणे यावेळेसही भारतावर आरोप केले आहेत. भारताकडून यासिन मलिक प्रकरणात मानवी अधिकाराचं उल्लंघन करण्यात आल्याचं आफ्रिदीने म्हटलंय. इतकंच नाही तर, आफ्रिदीने संयुक्त राष्ट्र संघाला साकडं घातलंय.
आफ्रिदीने केलेल्या या ट्विटमुळे त्याच्यावर सडकून टीका केली जात आहे. आफ्रिदीवर अनेक नेटकरी ट्विट करुन आपला संताप व्यक्त करत आहेत.
यासीन मलिक हा फुटीरतावादी नेता आहे. तो जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) शी संबंधित आहे. यासिन काश्मीरच्या राजकारणात नेहमीच सक्रिय राहिला आहे. तरुणांना भडकवण्याचा आणि हातात बंदूक घेण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.