Virat Kohli : पाकिस्तानच्या माजी खेळाडूने हद्दच केली, म्हणतोय ''50 ओव्हरमध्ये मीच नंबर 1, माझ्यानंतर कोहली''

Virat Kohli : पाकिस्तानचा माजी खेळाडू खुर्रम मंजूरने (Khurram Manzoor) दावा केला आहे की, त्याच्याकडे आधुनिक काळातील भारतीय फलंदाजापेक्षा एक चांगला लिस्ट-ए रेकॉर्ड आहे. त्यामुळे प्रत्येकाने क्रमवारीत त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे. विराट कोहलीसारखे खेळाडू देखील या यादीत त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतात, असे त्यांचे म्हणणे आहे. 

Updated: Jan 25, 2023, 06:00 PM IST
Virat Kohli : पाकिस्तानच्या माजी खेळाडूने हद्दच केली, म्हणतोय ''50 ओव्हरमध्ये मीच नंबर 1, माझ्यानंतर कोहली'' title=

IND vs NZ : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हे क्रिकेट विश्वातलं मोठं नाव आहे. क्रिकेट जगतात त्याची तुलना अनेक दिग्गज खेळाडूंसोबत होते. मात्र ही तुलना अनेकदा पाकिस्तानी खेळाडू आणि फॅन्सना पचत नसल्याचे नेहमीच दिसून येते. कारण पाकिस्तानी फॅन्स विराट कोहलीपेक्षा बाबर कसा सर्वश्रेष्ठ आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात. असे सर्व सुरु असताना आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूने एक खळबळजनक विधान केली आहे. त्याच्या या विधानाची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.  

 

हे ही वाचा :  T20 मालिकेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

 

विराट कोहली (Virat Kohli) एक महान फलंदाज आणि कर्णधार आहे. त्याचे आकडे पाहिलेत तरीही हेच उत्तर समोर येईल. सध्या विराट कोहलीच्या नावावर 74 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. सचिनच्या 100 आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून तो केवळ 26 शतके दुर आहे. सध्याचा त्याचा परफॉर्मन्स पाहता तो हा आकडा लवकरच गाठेल अशी भारतीय फॅन्सना अपेक्षा आहे. असे असताना पाकिस्तानच्या माजी खेळाडू्ने एक खळबळजनक विधान केले आहे.50 ओव्हरच्या खेळात मी विराट कोहलीपेक्षा चांगला असल्याचा दावा त्याने केला आहे. त्याच्या या दाव्याची खुप चर्चा आहे.

पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे विधान काय? 

पाकिस्तानचा माजी खेळाडू खुर्रम मंजूरने (Khurram Manzoor) दावा केला आहे की, त्याच्याकडे आधुनिक काळातील भारतीय फलंदाजापेक्षा एक चांगला लिस्ट-ए रेकॉर्ड आहे. त्यामुळे प्रत्येकाने क्रमवारीत त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे. विराट कोहलीसारखे खेळाडू देखील या यादीत त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतात, असे त्यांचे म्हणणे आहे. 

मी माझी तुलना विराटशी करत  नाही आहे. मात्र 50 ओव्हरच्या खेळात टॉप टेनमध्ये मी पहिल्या क्रमांकावर येतो.  माझ्यानंतर विराट कोहलीचा नंबर लागतो, असे खुर्रम मंजूर (Khurram Manzoor) म्हणालाय. तसेच माझा कन्वर्झन रेट (Conversion Rate) देखील त्याच्यापेक्षा चांगला आहे. तो प्रत्येक 6  मॅचमध्ये शतक करतो. मी प्रत्येक 5.68 मॅचमध्ये शतक झळकावले आहे. गेल्या 10 वर्षांत माझ्या 53 च्या सरासरीच्या आधारे, मी लिस्ट ए क्रिकेटमध्ये जगात पाचव्या क्रमांकावर असल्याचे त्याने म्हटलेय. नादिर अलीच्या युट्यूब चॅनलवर त्याने हे विधान केले आहे. त्याच्या या विधानाची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 

कारकिर्द

खुर्रम मंजूरने 2008 मध्ये देशासाठी पदार्पण केले होते. खुर्रमने पाकिस्तानसाठी 16 कसोटी, 7 एकदिवसीय आणि 3 टी-20 असे एकूण 26 सामने खेळले आहेत. खुर्रमने (Khurram Manzoor)शेवटचा सामना 2016 मध्ये T20I फॉरमॅटमध्ये खेळला होता आणि तेव्हापासून तो पुनरागमन करू शकला नाही.

दरम्यान खुर्रम मंजूरच्या (Khurram Manzoor) या दाव्याची आणि विधानाची क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. या दाव्यावर आता आणखीण कोणत्या प्रतिक्रिया समोर येतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.