Imran Khan Attacked React Of Babar Azam: पाकिस्ताननं कायमचं दहशतवादाला खतपाणी घातलं आहे आणि याची प्रचिती वारंवार होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यामुळे समोर आली आहे. टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना सुरु असतानाच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि कर्णधार इमरान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला (Imran Khan Attacked) झाला. इमरान खान यांना लाहोरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून स्थिती स्थिर आहे. इमरान खान यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम उपचार करत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तान संघांचे धाबे चांगलेच दणाणले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने या घटनेची निंदा केली आहे.
"इमरान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मी कठोर शब्दात निंदा करतो. अल्लाह कप्तानला व्यवस्थित ठेव. आमच्या पाकिस्तानची सुरक्षा कर. आमीन.", असं ट्वीट पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने केलं आहे.
Strongly condemn this heinous attack on @ImranKhanPTI. May Allah keep Kaptaan safe and protect our beloved Pakistan, Ameen.
— Babar Azam (@babarazam258) November 3, 2022
दुसरीकडे पाकिस्तान संघाचा क्रिकेटमध्ये पराभव झाला तरी चाहते आक्रमक पवित्रा घेतात. ही स्थिती पाहून पाकिस्तान संघाचे धाबे दणाणले आहेत. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना 33 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा अजूनही पल्लवित आहे. जर दक्षिण आफ्रिका (south africa) नेदरलँड्सविरूद्ध हरली आणि पाकिस्तानने शेवटचा सामना जिंकल्यास तो थेट सेमी फायनलमध्ये दाखल होणार आहे. आणि जर भारत हरल्यास आणि पाकिस्तान जिंकल्यास रनरेट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.