PAK vs WI | पाकिस्तानची फिल्डिंग सुधरुच शकत नाही, विश्वास नसेल तर हा व्हीडिओ पाहा

पाकिस्तानच्या 2 खेळाडूंनी वेस्टइंडिजच्या फलंदाजाचा अगदी सहज सोपा कॅच सोडला. यामुळे या दोघांसह पाकिस्तान टीमला ट्रोल केलं जातंय. 

Updated: Dec 17, 2021, 06:08 PM IST
PAK vs WI | पाकिस्तानची फिल्डिंग सुधरुच शकत नाही, विश्वास नसेल तर हा व्हीडिओ पाहा  title=

कराची : पाकिस्तानने (Pakistan) तिसऱ्या टी 20 सामन्यात वेस्टइंडिजवर (West Indies) 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यासह पाकिस्तानने विडिंजला 3-0 ने क्लीन स्वीप दिला. पाकिस्तानने ही सीरिज जिंकली. मात्र त्यानंतरही पाकिस्तान टीमला खराब फिल्डिंगमुळे (Pakistan Fielding) सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. (pak vs wi pakistan vs west indies 3rd t 20i mohammad hasnain and iftikhar ahmed catch drop shamarh brooks at national stadium karachi)   

पाकिस्तानच्या 2 खेळाडूंनी वेस्टइंडिजच्या फलंदाजाचा अगदी सहज सोपा कॅच सोडला. यामुळे या दोघांसह पाकिस्तान टीमला ट्रोल केलं जातंय. तसंच यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या फिल्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पाकिस्तानच्या मोहम्मद हसनैन (Mohammad Hasnain) आणि इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) या दोघांनी सोपा (Catch Drop) कॅच सोडला. त्यामुळे हे दोघेही नेटीझन्सच्या निशाण्यावर आहेत. 

नक्की काय झालं?

हा सर्व प्रकार विडिंजच्या डावातील 8 व्या ओव्हरमध्ये घडला. मोहम्मद नवाज (Mohammad Nawaz) बॉलिंग करत होता. तर  विंडिजकडून शामराह ब्रूक्स (Shamarh Brooks) बॅटिंग करत होता.

शामराहने ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर फोर खेचला. या फोरसह शामराह 27 धावांवर जाऊन पोहचला. शामराह मैदानात सेट झाला होता. त्यामुळे पाकिस्तानसमोर शामराहला आऊट करण्याचं आव्हान होतं. 

नवाजने दुसरा चेंडू टाकला. शामराहने लांब फटका मारला. या फटक्यापासून हसनैन आणि अहमद हे दोघेही जवळ होते. हसनैन लॉन्ग ऑनवर होता. तर अहमद डीप मिड विकेटवर होता. दोघांसाठी सोपा कॅच होता.

मात्र दोघांमध्ये अचूक तालमेळ नव्हतं. तु घे मी घे मध्ये हा चेंडू जाऊन दोघांमध्ये पडला. अशा प्रकारे शामराहला जीवनदान मिळालं. हा असा सोपा कॅच सोडल्याने पाकिस्तानची फिल्डिंग किती कमकुवत आहे, हे पुन्हा निदर्शनास आलं आहे.   

दरम्यान हा कॅच ड्रॉपमुळे क्रिकेट चाहत्यांना शोएब मलिक आणि सईद अजमलने सोडलेल्या कॅचची आठवण झाली. या दोघांनीही अशाच प्रकारे कॅच सोडला होता. त्यावेळेस या दोघांनी ख्रिस गेलचा कॅच सोडला होता.