PAK vs NZ: तब्बल 22 वर्ष आपल्या अष्टपैलू कामगिरीने पाकिस्तानला नव्या उंचीवर पोहोचवणाऱ्या शहिन अफ्रिदीच्या (Shahid Afridi) खांद्यावर नवी जबाबदारी (interim Chief Selector) देण्यात आली. शाहिद आफ्रिदीला (Shahid Afridi) पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचा हंगामी मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आलंय. त्यानंतर पुन्हा एकदा चीफ सिलेक्टर आणि कॅप्टन बाबर आझममध्ये (Babar Azam) सर्वकाही अलबेल नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आता क्रिडाविश्वात एकच चर्चा होताना दिसत आहे. (pak vs nz differences with chief selector shahid afridi babar azam broke silence marathi news)
शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) संघ निवड करत असताना कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam) सल्ला घेत नसल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा शाहिद अफ्रिदी आणि बाबर आझममध्ये वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. एका पत्रकार परिषदेत (Press Conference) विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बाबरने मौन सोडलं आहे.
सिलेक्शन कमिटीकडून माहिती मिळते की, तुम्ही एक मतावर सहमत नाहीये, हे खरं आहे का, असा प्रश्न बाबरला विचारण्यात आला. त्यावर बोलताना बाबर म्हणतो, "तसं काही नाही... आम्ही सध्या सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि जे काही निर्णय घेतले जातात त्याबद्दल बोललं जात असलं तरी माझं लक्ष सध्या सामन्यावर आहे."
न्यूझीलंडविरुद्ध (PAK vs NZ) निवडलेल्या संभाव्य संघात कर्णधार आणि प्रशिक्षकाचा सल्ला घेण्यात आला नाही, अशी बातमी समोर आली आहे. पीसीबीमधील (PCB) बदलाचा संघावर कसा परिणाम झाला?, असा प्रश्न विचारल्यावर बाबरने रोखठोक उत्तर दिलं.
Pakistan captain Babar Azam's press conference at the end of the first Test.#PAKvNZ | #TayyariKiwiHai https://t.co/clFdocY85Z
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 30, 2022
दरम्यान, पीसीबीमध्ये जे काही चालू आहे, ते संघात न आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. क्रिकेट खेळणं आणि त्यावर लक्ष केंद्रित करणं हे आमचं काम आहे. आम्ही बाहेरच्या गोष्टी आत आणत नाही. पीसीबीमध्ये (PCB) घडणाऱ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाही. जर आपण बाहेरचा विचार करू लागलो तर आतील कामगिरी खाली जाईल, असंही बाबर (Babar Azam) म्हणाला आहे.