पद्मभूषण पुरस्कारासाठी नामांकन झाल्याने पी. व्ही. सिंधूने मानले आभार

पदमभूषण पुरस्कारासाठी पी. व्ही. सिंधूच्या नावाची शिफारस केल्यामुळे सिंधूने सगळ्यांचे आभार मानले आहेत. त्याबद्दल सिंधू म्हणाली, "मी खूप खुश आहे आणि पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस केल्यामुळे मी खेळ मंत्रालयाचे आभार मानते." सिंधूने रियो ऑलम्पिकमध्ये ऐतिहासिक रजत पदक जिंकले होते. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 26, 2017, 06:21 PM IST
पद्मभूषण पुरस्कारासाठी नामांकन झाल्याने पी. व्ही. सिंधूने मानले आभार  title=

हैद्राबाद : पदमभूषण पुरस्कारासाठी पी. व्ही. सिंधूच्या नावाची शिफारस केल्यामुळे सिंधूने सगळ्यांचे आभार मानले आहेत. त्याबद्दल सिंधू म्हणाली, "मी खूप खुश आहे आणि पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस केल्यामुळे मी खेळ मंत्रालयाचे आभार मानते." सिंधूने रियो ऑलम्पिकमध्ये ऐतिहासिक रजत पदक जिंकले होते. 

सिंधूच्या नावाची शिफारस झाल्यानंतर सिंधूचे वडील म्हणाले, "आम्ही खेळ मंत्रालयाचे आभार मानतो. परंतु, जोपर्यंत घोषणा होणार नाही तोपर्यंत वाट पाहावी लागेल. 

विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कांस्य आणि एकदा रजत पदक जिंकणारी सिंधू गेल्या वर्षी रियो ऑलंम्पिकमध्ये रजत पदकाची मानकरी ठरली होती. हे पदक पटकवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. त्यांनतर तिची घोडदौड सातत्याने चालूच आहे. 

हैद्राबाद येथील २२ वर्षाच्या मुलीने २०१६ मध्ये चीन ओपन सुपर सीरीज प्रीमियर, इंडिया ओपन सुपर सीरीज शिवाय गेल्या महिन्यात ग्लास्गो विश्व चॅम्पियनशिपमध्ये रजत पदक जिंकले. तीने गेल्या महिन्यात कोरिया ओपनमध्ये तिसरे सुपर सीरीज शीर्षक जिंकले. 

सिंधूने यावर्षी लखनऊमध्ये सैय्यद मोदी ग्रां प्री गोल्ड टूर्नामेंट जिंकली. त्यानंतर एप्रिलमध्ये सिंधूने सर्वोत्कृष्ट दुसरे स्थान पटकावले. सोलमध्ये केलेल्या दमदार प्रदर्शनानंतर गेल्यावर्षी देखील तिने हे स्थान पटकावले होते. 

सिंधूने २०१४ मध्ये राष्ट्रमंडळ, आशियाई खेळ आणि आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले. मार्च २०१५ मध्ये सिंधूला देशातील चौथ्या सर्वोच्च नागरिक सम्मान पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.