...अन् पुन्हा एकदा विराट कोहलीला भर मैदानात राग अनावर

प्रेक्षकांना पुन्हा एकदा संतापलेला विराट कोहली पहायला मिळाला.

Updated: Oct 7, 2021, 09:07 AM IST
...अन् पुन्हा एकदा विराट कोहलीला भर मैदानात राग अनावर title=

अबु धाबी : आयपीएलच्या कालच्या सामन्यात रॉयल चँलेंजर बंगळूरूला सनरायझर्स हैद्राबादकडून 4 रन्सनी पराभव स्विकारावा लागला. दरम्यान या सामन्यात प्रेक्षकांना पुन्हा एकदा संतापलेला विराट कोहली पहायला मिळाला. विराट त्याच्याच टीममधील एका बॉलवर इतका भडकला की अनेकजण अवाक् झाले. दुसरीकडे विराट कोहलीचा हा व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कोहलीला राग अनावर

हैद्राबादच्या फलंदाजी दरम्यान दुसऱ्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. वास्तविक, SRH फलंदाज अभिषेक शर्माने एक शॉट खेळला. यानंतर तो चेंडू मोहम्मद सिराजच्या दिशेने गेला. सिराजकडे झेल पकडण्याची वेळ होती, पण त्याने तो सिम केला आणि डाईव्ह मारून त्याने झेल सोडला.

सिराजने सोडला कॅच

कोहलीला विश्वास होता की, सिराज तो कॅच पकडेल. पण सिराजने झेल सोडताच कोहली शांत झाला. विराट कोहली मोहम्मद सिराजवर काहीसा चिडताना दिसला. मोहम्मद सिराजने झेल सोडला आणि विराट कोहली त्याच्यावर भडकला.

हैद्राबादचा विजय

सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या गोलंदाजांच्या बळावर आयपीएल 2021 च्या 52व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चार रन्सने पराभव केला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स गमावत 141 धावा केल्या. 

या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ 20 ओव्हरमध्ये सहा विकेट्स गमावत केवळ 137 धावा करू शकला. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर, सिद्धार्थ कौल, उम्रान मलिक आणि रशीद खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.