Robinson Khawaja fight Video: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Eng vs Aus) या दोन्ही संघात रंगतदार फाईट पहायला मिळाली. इंग्लंडने दुसऱ्या डावात 273 धावा करत कांगारूंसमोर तगडं आव्हान दिलं होतं. सामन्याचा पाचवा दिवस चर्चेत राहिला तो ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) आणि उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) यांच्यातील वाकयुद्धामुळे. पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवशी 282 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सामना दोन गडी राखून जिंकला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आणि इंग्लिश गोलंदाज ओली रॉबिन्सनशी भिडताना दिसले. त्याचा व्हिडिओ देखील (Viral Video) सध्या व्हायरल होत असल्याचं दिसतंय.
पाचव्या दिवशी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वादामुळे दोन्ही खेळाडूंमधील तणाव दुसऱ्या डावात वाढला. म्हणूनच तू फलंदाज नाहीस, असं स्टंपच्या माईकमध्ये ऐकायला येत होता. त्यामुळे नक्की काय झालं होतं? असा सवाल आता विचारला जातोय. तणावाचं दृश्य 43 व्या षटकानंतर पाहायला मिळालं. रॉबिन्सनने त्याची ओव्हर पूर्ण केली. तू काय म्हणालास मित्रा? असा सवाल ख्वाजाने केला होता, असं स्काय स्पोर्ट्सने म्हटलं होतं. मला माहित नाही तू कशाबद्दल बोलतोय, असं प्रत्युत्तर रॉबिन्सनने दिलं. त्याचवेळी दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना खुन्नस दिली. अँडरसनने मध्यस्ती केली आणि रॉबिन्सनला वादातून बाहेर खेचलं.
आणखी वाचा - James Anderson: चाळीशी गाठली पण गडी थकला नाय, अँडरसनने रचला अनोखा रेकॉर्ड!
शतक झळकावणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा याला बाद केल्यानंतर रॉबिन्सनने आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. यानंतर त्याने अपशब्द वापरले अन् डिवचण्याचा प्रयत्न केला होता. f**k off, f**king prick, अशा शब्दात रॉबिन्सनने जल्लोष केला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात मात्र, ख्वाजाने देखील सडेतोड उत्तर दिलं होतं.
And this is why I don't engage with 'supporting' a cricket team. Ollie Robinson looks Khawaja in the eye and yells "f**k off, f**king prick". Is that passion/competitive spirit or just plain dehumanising, in a game supposedly rooted in values and sportsmanship? pic.twitter.com/8LQErWE7hT
— maatin (@maatin) June 18, 2023
Ollie Robinson is a massive cunt. Wonder why he is targeting Usman Khawaja of all people? He proper racist and racism has no place in cricket.#Ashes2023 #Ashes23 pic.twitter.com/4QItX5cr3b
— Tehseen Qasim (@Tehseenqasim) June 20, 2023
पहिल्या डावानंतर त्याला त्याने केलेल्या कृत्याबद्दल विचारलं. त्यावेळी त्याने उत्तरावर पाणी सोडलं. ही माझी पहिली होम अॅशेस आहे आणि त्यावेळी मोठी विकेट मिळणे माझ्यासाठी खास होते. मला वाटते उस्मान ख्वाजा खूप चांगला खेळला. त्यावेळी या विकेट्स मिळवणे एक संघ म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचे होते. आपल्या सर्वांना अशा प्रकारच्या नाटकासह एक खेळ हवा असतो ना? असा सवाल रॉबिन्सनने केला होता.