NZ vs AUS T20I : टीम डेव्हिडचा 'विराट' अवतार, ऑस्ट्रेलियाला 9 बॉलमध्ये 32 धावांची गरज अन्...; पाहा थरारक Video

Tim David, final thriller over : हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या या सामन्यात (NZ vs AUS 1st T20I) ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून विजय मिळवलाय. त्याचबरोबर मालिकेत आता 1-0 ने आघाडी घेतली आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Feb 21, 2024, 07:16 PM IST
NZ vs AUS T20I : टीम डेव्हिडचा 'विराट' अवतार, ऑस्ट्रेलियाला 9 बॉलमध्ये 32 धावांची गरज अन्...; पाहा थरारक Video title=
NZ vs AUS 1st T20I, Tim David, final thriller over

NZ vs AUS 1st T20I : क्रिकेटमध्ये असे फार थोडे सामने असतात, जे डोळ्याचे पारणं  फेडून जातात. अशातच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-ट्वेंटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज टीम डेव्हिड (Tim David) याने किवींच्या जबड्यातून विजय हिसकावला अन् पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात विजय मिळवला आहे. हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या (final thriller over) या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून विजय मिळवलाय. त्याचबरोबर मालिकेत आता 1-0 ने आघाडी घेतली आहे. मात्र, सामन्यात नेमकं काय झालं? ऑस्ट्रेलियाने कसा गेम पालटला? पाहुया... या सामन्यानंतर आता टीम डेव्हिडच्या फलंदाजीची तुलना विराट कोहलीसोबत होत आहे.

ऑस्ट्रेलियासमोर टी-ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करण्याचं लक्ष होतं. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 215 धावा उभ्या केल्या होत्या. यामध्ये चिन रवींद्रने कॉनवेसोबत दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी उभा केली. तर कॉनवेने 46 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकार खेचले. न्यूझीलंडने केलेल्या आक्रमक फलंदाजीला ऑस्ट्रेलियाला तोंड देयचं होतं. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी जबर मार खालला अन् न्यूझीलंडने 216 धावांचं लक्ष कांगारूंसमोर ठेवलं.

वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने देखील आक्रमक फटकेबाजी करत दमदार सुरूवात केली. कर्णधार मिचेल मार्शने 44 चेंडूत 2 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 72 खेळी केली. तर मॅक्सवेलचं वादळ या सामन्यात चाललं नाही. जॉस इंग्लिसच्या शांत खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संकटात सापडली होती. मात्र, त्यानंतर टीम डेव्हिड मैदानात आला अन् सगळी कसर भरून काढली.

असा पलटला सामना

सामना जवळजवळ न्यूझीलंड दिसतेल असं चित्र समोर येत होतं. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या 9 चेंडूत 32 धावांची गरज होती. टीम डेव्हिडने 19 व्या ओव्हरच्या अखेरच्या तीन चेंडूंवर एक फोर आणि सलग दोन खणखणीत सिक्स ठोकले अन् सामन्याचं पारडं फिकलं. आता ऑस्ट्रेलियाला 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज होती. मात्र, पहिल्या तीन बॉलवर फक्त 4 धावा निघाल्या. आता सामना कोणत्याही दिशेने जाणार होता. मात्र, टीम डेव्हिड पुन्हा स्टाईकवर आला अन् त्याने खणखणीत सिक्स खेचला. पाचव्या बॉलवर 2 धावा पळाला अन् आता सामना अखेरच्या टप्प्यावर आला. 

शेवटच्या बॉलवर ऑस्ट्रेलियाला 4 धावांची गरज होती. टीम डेव्हिडने स्टाईकवर होता. तर समोर खुंखार साऊदी... साऊदीने बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला अन् टीम डेव्हिडने लाँग ऑफ दिशेने बॉल टोलवला. दोन फिल्डरांनी बॉल रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही इंचावरून बॉल फिल्डरला पकडता आला नाही अन् श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात अखेर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

पाहा Video