Hardik Pandya: यामध्ये कोणीही कोणाचं नाहीये...; IPL पूर्वीच हार्दिकच्या विधानाने खळबळ

IPL 2024 Hardik Pandya Rohit Sharma Video: मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला टीममध्ये संधी दिली. त्यानंतर प्रचंड गोंधळ झाला. या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 16, 2024, 10:22 AM IST
Hardik Pandya: यामध्ये कोणीही कोणाचं नाहीये...; IPL पूर्वीच हार्दिकच्या विधानाने खळबळ title=

IPL 2024 Hardik Pandya Rohit Sharma Video: येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. यावेळी आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. यावेळी मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला टीममध्ये संधी दिली. त्यानंतर प्रचंड गोंधळ झाला. या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आता स्पर्धा जवळ आली आहे आणि त्याआधी वेगवेगळे प्रोमो आणि व्हिडिओ समोर येतायत

शुक्रवारी अशाच एका जाहीरातीचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये आयपीएल टीमचे कर्णधार एकमेकांना चिडवताना दिसतायत. हार्दिक पंड्याने त्याच्या X वर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममधून रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि इशान किशन दिसतायत.

या व्हिडिओमध्ये रोहित दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतसोबत बोलतोय. या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्याही बोलताना दिसतायत. या व्हिडीओची थीम अशी आहे की, या टूर्नामेंटमध्ये कोणतीही टीम किंवा कोणताही खेळाडू एकमेकांचे भाऊ किंवा मित्र नाहीत तर सगळे एकमेकांचे स्पर्धक आहेत. हार्दिकने हा व्हिडिओ एका खास कॅप्शनसह शेअर केला आहे.

कोणीही कोणाचं नाहीये...

हार्दिक पंड्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, भाईने तर सांगितलं या टूर्नामेंटमध्ये कोणीही कोणाचं नाहीये. मात्र आम्हीही तयार आहोत. या कॅप्शनचा स्पष्ट अर्थ तो आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या यांच्यात व्हिडिओमध्ये झालेल्या संभाषणाचा होता. या व्हिडीओमध्ये क्रुणाल म्हणतो की, या स्पर्धेत कोणीही कोणाचा भाऊ नाही. मग उत्तरात हार्दिकने लिहिले की, पण आम्ही पण तयार आहोत.

रोहित शर्माने ( Rohit Sharma ) देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ऋषभ पंतसोबत त्याची शाब्दिक मजेशीर बाचाबाची या व्हिडिओत दिसतोय. लीगमध्ये प्रवेश करताच भाईचारा संपलाय, असं पंत म्हणतोय. रोहितने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तू नियम बनवत राहा रिशु, आम्ही टेबलवर राज्य करू. याशिवा. सुनील शेट्टी आणि मी आमचा संघ निवडायला सुरुवात केली आहे, आता तुमची पाळी आहे.'' असं कॅप्शन रोहितने व्हिडिओला दिलंय.