VIDEO: रन-आउट, फ्री हिट आणि वाईड…, 20 व्या ओव्हरमध्ये घडला हाय व्होल्टेज ड्रामा

कालच्या सामन्यात राजस्थानच्या डावात शेवटच्या ओव्हरमध्ये लाईव्ह ड्रामा पाहायला मिळाला.

Updated: May 25, 2022, 08:20 AM IST
VIDEO: रन-आउट, फ्री हिट आणि वाईड…, 20 व्या ओव्हरमध्ये घडला हाय व्होल्टेज ड्रामा title=

मुंबई : राजस्थान रॉयल्सने क्वालिफायर 1 मध्ये गुजरातसमोर विजयासाठी 189 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. या हाय-व्होल्टेज सामन्यात राजस्थानच्या डावात शेवटच्या ओव्हरमध्ये लाईव्ह ड्रामा पहायला मिळाला. यश दयालच्या शेवटच्या बॉलवर राजस्थानचे दोन फलंदाज रन आऊट झाले. त्यापैकी एकाने नो बॉलवर एक विकेट गमावली, तर दुसरा फलंदाज वाईड बॉलवर रनआऊट झाला.

यश दयालच्या शेवटच्या ओव्हरमध्ये प्रेक्षकांना मैदानावर हा हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. राजस्थानचा फलंदाज जोस बटलर यश दयालच्या शेवटच्या बॉलवर दोन रन्ससाठी धावला. यावेळी तो स्ट्रायकर एंडवरून रन आऊट झाला. 

दरम्यान यानंतर मैदानावर नो बॉलचा सायरन वाजला. यामुळे राजस्थानला आणखी एक बॉल मिळाला. हा फ्रीट हीट बॉल होता. मात्र तरीही जॉस बटलर पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं कारण नियमानुसार फलंदाज नो बॉलवर रनआऊट होऊ शकतो.

मैदानावर घडलेला हाय व्होल्टेज ड्रामा पाहण्यासाठी क्लिक करा

यानंतर यश दयालने पुन्हा शेवटचा बॉल फेकला जो वाईड होता. यावेळी अश्विनला मोठा शॉट खेळायचा होता. अश्विन स्ट्रायकर एंडला उभा होता, तर दुसऱ्या बाजूने रियान पराग रन घेण्यासाठी स्ट्राइक बदलण्यासाठी धावला. यावेळी वाईड बॉलवर रियानची विकेट गेली. अशाप्रकारे एका बॉलवर दोन फलंदाज रनआऊट झाले. यामध्ये एकाने नो बॉलवर आणि दुसऱ्याने वाईड बॉलवर आपली विकेट गमावली.