कोलंबो : निडास ट्रॉफीत शुक्रवारी श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असा सामना रंगला. अतिशय रंगतदार झालेल्या या मॅचमध्ये अखेर बांगलादेशने श्रीलंकेवर २ विकेट्सने विजय मिळवला आहे.
श्रीलंकेवर विजय मिळवत बांगलादेशने अंतिम फेरीत मजल मारली आहे. आता अंतिम फेरीत भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना पहायला मिळणार आहे.
मॅचच्या सुरुवातीला बांगलादेशने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या बॉलर्सने सुरुवातीला चांगला परफॉरमन्स दाखवत श्रीलंकन बॅट्समनला घाम फोडला. श्रीलंकेची अर्ध्याहून अधिक टीम ५० रन्स पूर्ण करण्याआधीच माघारी परतली.
मात्र, त्यानंतर थिसारा परेरा आणि कुसल परेरा या दोघांनी टीमला सावरलं. त्यामुळे श्रीलंकन टीमने २० ओव्हर्समध्ये १५९ रन्सपर्यंत मजल मारली.
श्रीलंकन टीमकडून कुसल परेराने ४० बॉल्समध्ये ६१ रन्सची तुफानी खेळी खेळली यामध्ये ७ फोर आणि एका सिक्सरचा समावेश आहे. तर त्याला साथ दिली ती म्हणजे थिसारा परेला याने. थिसारा परेराने ३७ बॉल्समध्ये ५८ रन्सची खेळी खेळली. यामध्ये ३ फोर आणि ३ सिक्सरचा समावेश आहे. अशा प्रकारे श्रीलंकन टीमने १५९ रन्सपर्यंत मजल मारली.
यानंतर मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या टीमनेही चांगली सुरुवात केली. त्यानंतर श्रीलंकन बॉलर्सनेही चांगली बॉलिंग करत बांगलादेशला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस बांगलादेशने श्रीलंकेवर २ विकेट्सने विजय मिळवला आहे.