Neymar in Pune: पुण्यात येणार स्टार फुटबॉलर नेमार; 'या' ठिकाणी होणार सामना!

Neymar set to play in India : अल हिलालला आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन (AFC Champions League) चॅम्पियन्स लीगमध्ये भारताच्या मुंबई सिटी एफसी (Mumbai City FC) क्लबशी सामना होणार आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Aug 24, 2023, 08:25 PM IST
Neymar in Pune: पुण्यात येणार स्टार फुटबॉलर नेमार; 'या' ठिकाणी होणार सामना! title=

Neymar in AFC Champions League : फुटबॉल जगतात नाव कमवलेला खेळाडू म्हणजे ब्राझीलचा स्टार फुटबॉलर नेमार (Neymar)... मिडफिल्डर आणि डिफेन्डर यांच्यामधून अलगत फुटबॉल खेचण्याची कला नेमारला चांगलीच अवगत आहे. गेल्या काही महिन्यांपासून फुटबॉलर्सची चांदी झाल्याचं पहायला मिळतंय. नेमारने देखील जर्मनीची पीएसजी सोडून सौदी प्रो लीग संघाशी करार केला होता. त्यानंतर त्याला बक्कल पैसा देखील मिळालाय. भारतातच नव्हे तर जगभरात नेमारच्या चाहत्यांची भल्ल पहायला मिळते. अशातच आता नेमारला (Neymar in India) थेट पाहण्याची संधी भारतीयांना देखील मिळणार आहे. 

होय, ब्राझीलचा स्टार फुटबॉल (Neymar footballer) नेमारला भारतात खेळताना पाहण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. नेमारने सौदी प्रो लीगमध्ये अल हिलाल संघासोबत दोन वर्षाचा करार केला होता. तब्बल 800 कोटींहून अधिकची ऑफर स्विकारल्यानंतर आता तो लीगमध्ये कामगिरी गाजवताना दिसतोय. अशातच अल हिलालला आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन (AFC Champions League) चॅम्पियन्स लीगमध्ये भारताच्या मुंबई सिटी एफसी (Mumbai City FC) क्लबशी सामना होणार आहे. हा सामना पुण्यात (Pune News) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळंतय.

नेमार पुण्यात येणार?

फुटबॉल कॉन्फेडरेशन चॅम्पियन्स लीगमध्ये ग्रुप स्टेजमध्ये नेमारचा अल हिलाल आणि मुंबई सिटी एफसी या दोन्ही संघामध्ये सामना होणार आहे. या चॅम्पियन्स लीगमध्ये मुंबईला एक सामना घरच्या मैदानावर तर दुसरा सामना बाहेर खेळावा लागणार आहे. त्यामुळे आता अल हिलाल आणि मुंबई सिटी एफसी यांच्यातील सामना पुण्याच्या  श्री शिवछत्रपती बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या फोमग्राऊंडवर खेळवला जाण्य़ाची शक्यता आहे. याचा निर्णय 24 ऑगस्टला होणाऱ्या लीगच्या सामन्यावरून ठरणार आहे.

आणखी वाचा - फुटबॉल कोचने सेलिब्रेशनच्या बहाण्याने महिला कर्मचाऱ्याच्या छातीवर हात ठेवला अन् नंतर...; VIDEO व्हायरल

दरम्यान, आशियाई चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील साखळी सामने 18 सप्टेंबपरासून सुरू होणार आहेत. गटनिहाय पद्धतीने हे सामने खेळवले जातील. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो देखील भारतात येण्याची शक्यता होती. मात्र, रोनाल्डोचा क्लब अल - नासरचा समावेश हा ई गटात करण्यात आल्याने त्याची भारतवारी हुकल्याचं पहायला मिळतंय. नेमार पुण्यात आणि गर्दी होणार नाही, असं कसं होईल? आता पुणेकर नेमारचं स्वागत करतील याचीच चर्चा होताना दिसत आहे.