भारतापुढे विजयासाठी १९० धावांचे आव्हान

भारताविरुद्धच्या वॉर्मअप सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी १९० धावांचे आव्हान ठेवलेय. भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडला ५० षटकेही पूर्ण खेळता आली नाही.

Updated: May 28, 2017, 06:11 PM IST
भारतापुढे विजयासाठी १९० धावांचे आव्हान title=

ओव्हल : भारताविरुद्धच्या वॉर्मअप सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी १९० धावांचे आव्हान ठेवलेय. भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडला ५० षटकेही पूर्ण खेळता आली नाही.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने ३८.४ षटकांत १८९ धावा केल्या. न्यूझीलंडच्या ल्युके राँचीने सर्वाधिक ६६  धावा केल्या. तर जेम्स नीशामने नाबाद ४६ धावा केल्या. यादोघांव्यतिरिक्त न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजांला चांगली कामगिरी करता आली नाही. 

भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. रविंद्र जडेजाने दोन बळी तर आर. अश्विन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.