NZ VS SL, Chamika Karunaratne Video: कसोटी मालिकेनंतर आता न्यूझीलंड आणि श्रीलंका (New Zealand vs Sri Lanka) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. ऑकलँडच्या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना (NZ VS SL 1st ODI) खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने 198 धावांनी श्रीलंकेचा पराभव करत दमदार विजय नोंदवला आहे. सामना उत्कंठाला पोहोचला असताना एक धक्कादायक प्रकार घडला. त्याचा व्हिडिओ (Chamika Karunaratne Video) सध्या व्हायरल होताना दिसतोय. (New zealand vs Sri lanka 1st ODI bail dead battery save chamika karunaratne from run out nz vs sl latest sports news)
प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने दणक्यात सुरूवात केली. फिन अॅलेनने (Finn Allen) अर्धशतक ठोकलं. त्यानंतर गेन फिलिप्स आणि मिशेनने संघाला मजबूत स्तरावर नेलं. त्यानंतर रचिन रविंद्रने 49 धावा करत न्यूझीलंडला 274 धावांवर पोहोचवलं. न्यूझीलंडने दिलेल्या 275 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव गडगडला. त्यावेळी एक विचित्र घटना घडली.
ब्लेअर टिकनर श्रीलंकेच्या डावातील 18 वी ओव्हर टाकत होता. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर चमिका करुणारत्ने (Chamika Karunaratne) फलंदाजी करत होता. श्रीलंकेच्या डावात फलंदाजी करत असलेली चमिका करुणारत्ने धावा घेतली. चमिका वेळेत क्रीजवर पोहोचू शकला नाही. त्याचवेळी विकेटकिपरने बेल्स उडवले. सर्वांना वाटलं आता श्रीलंकेचा खेळ संपला. मात्र, त्यावेळी बेल्सची लाईटच (bells light) लागली नाही.
Quiet unfortunate and hilarious incident ,, Bail dead battery save Chamika Karunaratne , he was clearly short of the crease but given Not Out, #NZvsSL #NZvSL #SLvsNZ pic.twitter.com/Cbgcx0RODW
— Shakeel Khan Khattak (@ShakeelktkKhan) March 25, 2023
दरम्यान, बॅटरी बिघडल्याने बेल्सची लाईट (dead battery bails) लागली नाही. यानंतर अंपायरने निकाल देताना चमिका करुणारत्नेला नाबाद (Chamika Karunaratne Not Out) घोषित केलं. अंपायरच्या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ज्यावेळी बेल्सच्या लाईटची सिस्टिम नव्हती. त्यावेळी निकाल दिला जात होता ना? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.