मुंबई : आधुनिक क्रिकेटला अजून उत्तम आणि पारदर्शक बनवण्यासाठी मेरिलबोन क्रिकेट क्लबने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये क्रिकेटच्या काही नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यावेळी मांकडिंग आऊट, वाईड बॉल आणि डेड बॉल यासोबत अनेक नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
मांकडिंगसंदर्भात IPL 2019च्या सीझनमध्ये वादविवाद निर्माण झाला होता. किंग्स इलेवन पंजाबचा तत्कालीन कर्णधार रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जॉस बटलरला अशा पद्धतीने आऊट केल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. मात्र आता नियमांत बदल झाल्यामुळे वादाचा मुद्दा उपस्थित होणार नाही.
रिप्लेसमेंट नियम 1.3 करण्यात आलाय. या कायद्यानुसार,
खेळादरम्यान मैदानात बाहेरील व्यक्ती, प्राणी किंवा इतर कशानेही अडथळा येत असल्यास किंवा पिचचं नुकसान झाल्यास अंपायर निर्णय घेऊन तो डेड बॉल म्हणून घोषित करू शकतात.
जर चेंडू फलंदाजाकडे गेला आणि तो खेळू शकला, तर अंपायर तो योग्य चेंडू मानू शकतो. जर फलंदाजाला खेळता येत नसेल तर त्याला वाईड करार देण्यात येईल.
जर बॉल खेळपट्टीच्या बाहेर पडला, तर नवीन कायदा 25.8 फलंदाजाला जोपर्यंत फलंदाजाच्या बॅटचा हिस्सा पिचच्या आत असेल तोवर खेळण्याची परवानगी देतो. जो जर फलंदाज याच्या पलीकडे गेला तर अंपायर त्याला डेड बॉल म्हणतील. जर एखाद्या बॉलने फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडलं तर त्याला नो-बॉल घोषित केले जाईल.
फिल्डींग करणाऱ्या टीमतील कोणत्याही खेळाडूची चुकीची हालचाल दिसल्यास, फलंदाजी करणाऱ्या टीमला दंड म्हणून 5 रन्स दिले जातील. यापूर्वी या प्रकरणात त्याला डेड बॉल असं म्हटलं जात होतं. अशा परिस्थितीत फलंदाजाने चांगला शॉट खेळला तर त्या रन्सचा विचार केला जात नव्हता.
हा नियम 41 (अयोग्य खेळ) वरून 38 (रनआऊट) वर हलवण्यात आला आहे. यानुसार, जर गोलंदाजाने गोलंदाजी करण्यापूर्वी लगेच नॉन स्ट्रायकरवर उभा असलेला खेळाडू क्रीजमधून बाहेर आला आणि गोलंदाजाने स्टंपवर चेंडू मारला, तर नॉन-स्ट्रायकरला आऊट दिलं जाईल. यापूर्वी ते रनआऊट श्रेणीत नव्हतं.
जुन्या नियमानुसार, गोलंदाज झेलबाद होतो तेव्हा रन घेण्यासाठी खेळाडू एकमेकांची जागा घेत असतात. त्यावेळी नवा खेळाडू मैदानात आल्यावर नॉन स्ट्राईकवरुन खेळाला सुरुवात करायचा. मात्र आता या नियमात बदल करण्यात आला आहे. नव्या खेळाडूला स्ट्राईकवरुन पहिला चेंडू खेळावा लागणार आहे.
कोरोनाच्या काळात बॉलवरवर लाळ लावणं बंद झालं होतं. तर आता हा नियम कायमचा कायम करण्यात आला आहे. म्हणजेच क्रिकेटचा बॉल चमकण्यासाठी थुकीचा वापर करता येत नाही. यावेळी घामाचा वापर केला जाऊ शकतो.