VIDEO: IPL विजयानंतर Hardik Pandya च्या 'सौ.' भावूक, पतीच्या मिठीचा आधार

या ऐतिहासिक विजयानंतर हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकही खूप भावूक झाली होती.

Updated: May 30, 2022, 08:44 AM IST
VIDEO: IPL विजयानंतर Hardik Pandya च्या 'सौ.' भावूक, पतीच्या मिठीचा आधार title=

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सिझनला अखेर विजेता सापडलाय. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्सने अखेर विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद स्विकारलेल्या हार्दिक पंड्यानेही स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. पहिल्याच सिझनमध्ये विजेतेपद पटकावणारी गुजरात दुसरी टीम ठरली आहे. 

IPL 2022 सुरु होण्यापूर्वी हार्दिक पांड्या 15 व्या सिझनमध्ये विजयी कर्णधार होईल असा कोणीही विचार केला नसेल. या ऐतिहासिक विजयानंतर हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकही खूप भावूक झाली होती. यावेळी हार्दिकला मिठी मारताना तिलाही अश्रू अनावर झाले होते.

IPL 2022 च्या प्रत्येक सामन्यामध्ये हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक गुजरात टायटन्सला सपोर्ट करताना दिसली होती. संपूर्ण सिझनमध्ये हार्दिकसह नताशा संपूर्ण टीमसह हार्दिकला प्रोत्साहन देत होती. 

कर्णधार म्हणून पहिल्याच सिझनमध्ये विजय मिळवणं हा खेळाडूंच्या कुटुंबासाठीही खूप खास क्षण आहे. यावेळी भावूक होऊन गुजरातच्या विजयानंतर नताशा स्टॅनकोविच मैदानात आली आणि तिने हार्दिक पांड्याला मिठी मारली.

IPL 2022 च्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या शानदार सामन्यात संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मोठी धावसंख्या न उभारता आल्याने त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.