नाशिकमध्ये 18 जिल्ह्यांची रोलर स्केटिंग

 तीन गटात या स्पर्धा खेळल्या जात असून राज्यभरातल्या १८ जिल्ह्यातले ५५ संघ या स्पर्धेसाठी दाखल झाले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 6, 2018, 08:50 PM IST
नाशिकमध्ये 18 जिल्ह्यांची रोलर स्केटिंग title=

नाशिक : नाशिकमध्ये राज्यस्तरीय रोलर स्केटिंग हॉकी स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. तीन गटात या स्पर्धा खेळल्या जात असून राज्यभरातल्या १८ जिल्ह्यातले ५५ संघ या स्पर्धेसाठी दाखल झाले आहेत.

एकंदर सहा संघ निवडले जाणार

१२ वर्षाखालील, १६ वर्षाखालील जुनिअर गट आणि १६ वर्षावरील सिनिअर गट असे तीन वर्गवारीत ही स्पर्धा होत आहे. यातून प्रत्येक वर्गवारीतून मुला मुलींचा प्रत्येकी एक असे एकंदर सहा संघ निवडले जाणार आहेत. 

तीन वर्गवारीत ही स्पर्धा

१८ जानेवारीपासून होणा-या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये हे संघ महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतील. नाशिक जिल्हा रोलर स्केटिंग हॉकी असोसिएशन आणि राज्य रोलर स्केटिंग असोसिएशननं या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.