Vijay Hazare Trophy 2022: धोनीने संघातून काढलं, पण पठ्ठ्यानं दाखवला दम; 277 धावांची वादळी खेळी करत रचला इतिहास!

Narayan Jagadeesan Breaks World Record: एन जगदीसनने (N Jagadeesan 277) विजय हजारे ट्रॉफीमध्ये 277 धावांची शानदार खेळी (Vijay Hazare Trophy) करत एक मोठा विक्रम नावावर केला आहे.  

Updated: Nov 21, 2022, 06:34 PM IST
Vijay Hazare Trophy 2022: धोनीने संघातून काढलं, पण पठ्ठ्यानं दाखवला दम; 277 धावांची वादळी खेळी करत रचला इतिहास! title=
Narayan jagadeesan

N Jagadeesan Record: चेन्नईचा कॅप्टन कुल आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याची निवड चुकली, असं फार क्वचित पहायला मिळतं. धोनीची क्रिकटमधील हिऱ्यांची चांगलीच ओळख आहे. अनेक खेळाडूंना टीम इंडियापर्यंत पोहोचवण्याचं काम धोनीने केलंय. मात्र, यंदा धोनीची ओळख चुकल्याचं पहायला मिळतंय. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने (CSK) रिलीज केलेल्या एका खेळाडूंने (N Jagadeesan) मैदानात वादळ निर्माण केलं आणि आयपीएल लिलावासाठी सर्व फ्राँचायसीच्या निवडकर्त्यांना खडबडून जागं केलंय. त्या खेळाडूंचं नाव एन जगदीसन... (Narayan jagadeesan scores five consecutive hundred in vijay hazare trophy breaks world record)

N Jagadeesan ने रचला इतिहास - 

एन जगदीसनने (N Jagadeesan 277) विजय हजारे ट्रॉफीमध्ये 277 धावांची शानदार खेळी (Vijay Hazare Trophy 2022) करत एक मोठा विक्रम नावावर केला आहे. जगदीसनने 114 चेंडूत 25 चौकार खेचले तर15 गगनचुंबी षटकार देखील मारत गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवलं. लिस्ट A क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत मोठी धावसंख्या बनवण्याबरोबरच सलग 5 शतके ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटूही ठरला आहे.

टीम इंडियाचा स्टार प्लेयर विराट कोहलीने 2008-09 मध्ये चार शतकं (Virat Kohli) ठोकली होती, तर एन जगदीशनने सलग पाच शतके ठोकून विराटचा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचलाय. एवढंच नाही तर विराट कोहली, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल यांचा सिझनमधील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची विल्लेवाट जगदीसनने लावली आहे.

जगदीसनने विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या सहा डावात 799 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यंदा सर्वाधिक धावा केल्या आहेत. 125.82 च्या शानदार स्टाईक रेटने त्याने धावा खेचल्या आहेत. त्याचबरोबर त्याने कुमार संगाकाराचा (Kumar Sangakara) रेकॉर्ड देखील मोडीस काढला.

आणखी वाचा - Team India: भारताच्या 'या' स्टार खेळाडूमध्ये दिसते सेहवागची झलक; तरीही 17 महिने टीममधून बाहेर!

Vijay Hazare Trophy मध्ये नवा विक्रम

दरम्यान, विजय हजारे ट्रॉफीमध्ये तमिलनाडू (Vijay Hazare Trophy Tamilnadu) संघाने 50 ओव्हरमध्ये 506 धावा करत वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. फक्त 2 गड्यांच्या बदल्यात तमिलनाडू संघाने अरुणाचल प्रदेश (Arumachal Pradesh) विरुद्ध वादळी खेळी करत 506 धावा नोंदवल्या. एन जगदीसनला मोलाची साथ देत साई सुदर्शनने 102 बॉलमध्ये 154 धावा केल्या. त्यामुळे त्यांनी आता वनडे क्रिकेटमधील इंग्लंडच्या रेकॉर्डची मोडतोड केली आहे.