Musheer Khan Century : थोरल्याची टीम इंडियात एन्ट्री, तर धाकट्यानं वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकलं! खान बंधूंचा धमाका

Musheer Khan hit Second Century : टीम इंडियाच्या नव्या छाव्यांनी मोठी मजल मारलीये. सध्या सुरू असलेल्या सामन्यात (IND vs NZ) टीम इंडियाचा मिडल ऑर्डर खेळाडू  मुशीर खान याने धुंवाधार शतक ठोकलं आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Jan 30, 2024, 05:30 PM IST
Musheer Khan Century : थोरल्याची टीम इंडियात एन्ट्री, तर धाकट्यानं वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकलं! खान बंधूंचा धमाका title=
IND vs NZ, Musheer Khan Century

IND vs NZ, U19 WC : सध्या सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात (India U19 vs New Zealand U19) सुपर सिक्स फेरीतील सामना खेळवला जात आहे. सुपर सिक्सचा हा सामना ब्लोमफॉन्टेन येथील मंगाँग ओव्हल येथे खेळला जातोय. टीम इंडियाने आपले सर्व गटस्तरीय सामने जिंकले होते. अशातच आता टीम इंडियाच्या नव्या छाव्यांनी मोठी मजल मारलीये. सध्या सुरू असलेल्या सामन्यात टीम इंडियाचा मिडल ऑर्डर खेळाडू  मुशीर खान (Musheer Khan hit Second Century) याने धुंवाधार शतक ठोकलं आहे. 

सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान अंडर-19 विश्वचषकात आश्चर्यकारक कामगिरी करतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या सुपर-सिक्स सामन्यात त्यानं वादळी शतक झळकावलं. त्याने 109 चेंडूत आपलं वर्ल्ड कपमधील दुसरं शतक पूर्ण केलंय. त्याने 131 धावांची खेळी केली. 13 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने मुशीर खानने टीम इंडियाला मजबूत पकड मिळवून दिलीये. मुशीरचे या स्पर्धेतील हे दुसरं शतक होतं. यापूर्वी त्याने 118 धावांची इनिंग खेळली होती. सरफराज खानची नुकतीच इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी संघातून केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे टीम इंडियामध्ये खूप दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या सरफराज खानची निवड झाली आहे. एकीकडे मोठ्या भावाची टीम इंडियामध्ये निवड झाली अन् दुसरीकडे धाकट्या भावाने शतक ठोकल्याने खान फॅमिलीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

न्यूझीलंड: जेम्स नेल्सन, टॉम जोन्स, स्नेथ रेड्डी, लचलान स्टॅकपोल, ऑस्कर जॅक्सन (कर्णधार), ऑलिव्हर टेवाटिया, जेक कमिंग, ॲलेक्स थॉम्पसन (विकेटकीपर), इवाल्ड श्रेडर, रायन सोर्गस, मेसन क्लार्क.

भारत: आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (यष्टीरक्षक), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौमी पांडे.