मुरली विजयने IPL मध्ये असा रेकॉर्ड केला जो अद्याप कुठल्याच भारतीय खेळाडूने तोडला नाही

आयपीएलचा ११वा सीजन ७ एप्रिलपासून सुरु होत आहे आणि २७ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. आयपीएलमध्ये विजय मिळवण्यासाठी सर्वच टीम तयारीला लागल्या आहेत.

Updated: Mar 30, 2018, 09:51 PM IST
मुरली विजयने IPL मध्ये असा रेकॉर्ड केला जो अद्याप कुठल्याच भारतीय खेळाडूने तोडला नाही title=

नवी दिल्ली : आयपीएलचा ११वा सीजन ७ एप्रिलपासून सुरु होत आहे आणि २७ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. आयपीएलमध्ये विजय मिळवण्यासाठी सर्वच टीम तयारीला लागल्या आहेत. आयपीएलमध्ये दरवर्षी रेकॉर्ड्सचा अक्षरश: पाऊस पडतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रेकॉर्ड संदर्भात सांगणार आहोत जो मुरली विजयने बनवला होता. तसेच हा रेकॉर्ड अद्याप कुठल्याही भारतीय बॅट्समनला तोडता आला नाही.

तसं पहायला गेलं तर मुरली विजय हा टेस्ट क्रिकेटसाठी ओळखला जातो. मात्र, चेन्नई सुपर किंग्सच्या टीमकडून खेळताना मुरली विजयने आयपीएल २०१० मध्ये असा एक कारनामा केला जो गेल्या आठ वर्षांपासून कायम आहे.

मुरली विजयची तुफानी इनिंग

३ एप्रिल २-१० रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअममध्ये खेळण्यात आलेल्या मॅचमध्ये मुरली विजयने तुफानी इनिंग खेळली. चेन्नई सुपर किंग्सच्या टीमकडून खेळताना मुरली विजयने इनिंगची सुरुवात केली. मुरलीने राजस्थान रॉयल्सच्या बॉलर्सला चांगलाच घाम फोडत ५६ बॉल्समध्ये १२७ रन्स केले. 

मुरली विजयने आपल्या या इनिंगमध्ये ८ फोर आणि ११ सिक्सर लगावले. मुरली विजयचा हा आयपीएलमध्ये सर्वोत्तम स्कोअर आहे. चेन्नई सुपर किंग्सने या मॅचमध्ये २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावत २४५ रन्स बनवले. हा स्कोअर त्यावेळचा सर्वात मोठा स्कोअर होता.

एका इनिंगमध्ये ९ सिक्सर

सिक्सर किंग अशी ओळख असलेल्या युवराज सिंगने एका इनिंगमध्ये ९ सिक्सर लगावले आहेत. त्याने हा कारनामा २०१४ च्या आयपीएलमध्ये रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना दिल्ली डेअरडेविल्स विरोधात केला होता. युवराजने २९ बॉल्समध्ये नॉट आऊट ६८ रन्सची इनिंग खेळली होती. यामध्ये एक फोर आणि ९ सिक्सरचा समावेश होता.