4,6,6,6,4,6... मुंबईला मिळाला नवा 'पोलार्ड तात्या', दिल्लीला चोपणारा रोमॅरियो शेफर्ड आहे तरी कोण?

Romario Shepherd : रोमॅरियो शेफर्डने एनरिक नॉर्टजेला 4 सिक्स अन् 2 फोर मारून 20 ओव्हरमध्ये 234 चा आकडा पार करून दिला. मात्र, रोमॅरियो शेफर्डची आयपीएल कारकीर्द होती तरी कशी?

सौरभ तळेकर | Updated: Apr 7, 2024, 06:29 PM IST
4,6,6,6,4,6... मुंबईला मिळाला नवा 'पोलार्ड तात्या', दिल्लीला चोपणारा रोमॅरियो शेफर्ड आहे तरी कोण? title=
Romario Shepherd

Romario Shepherd, MI vs DC : मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यात 20 वा आयपीएल सामना खेळवला जातोय. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 234 धावा उभ्या केल्या. रोहित शर्माची आक्रमक सुरूवात अन् रोमॅरियो शेफर्ड (Romario Shepherd) याची वादळी फिनिशिंग यामुळे धावांचा मुंबईला डोंगर उभरता आला. या सामन्यात कॅप्टन पांड्याने (Hardik Pandya) संयमी खेळी केली. मात्र, मुंबईसाठी ही खेळी पुरेशी नव्हती. अखेरच्या ओव्हरमध्ये रोमॅरियो शेफर्डने कायापालट केला. शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईच्या पारडं जड कसं झालं? पाहा

अखेरच्या ओव्हरमध्ये टिम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्ड मैदानात पार रोवून उभे होते. टिम डेव्हिडने आपलं काम केलं होतं. मात्र, रोमॅरियो शेफर्डने अखेरच्या ओव्हरमध्ये संपूर्ण कसर काढली. रोमॅरियो शेफर्डने एनरिक नॉर्टजेला 4 सिक्स अन् 2 फोर मारले अन् अखेरच्या ओव्हरमध्ये 32 धावा केल्या. त्यामुळे मुंबईचा स्कोर थेट 234 चा आकडा गाठला. अखेरच्या ओव्हरमध्ये शेफर्डच्या आक्रमक माऱ्यामुळे दिल्लीवर अधिकचं प्रेशर आलं. रोमारियो शेफर्ड हा IPL मध्ये किमान 10 चेंडू खेळल्यानंतर सर्वाधिक बॅटिंग स्ट्राइक रेटने धावा करणारा फलंदाज बनला आहे.  यासह तो आयपीएल सामन्यात शेवटच्या षटकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे.

रोमॅरियो शेफर्डचं आयपीएल करियर 

रोमॅरियो शेफर्डने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत फक्त 6 सामने खेळले आहेत. सनरायझर्स हैदराबादने (SRH)  शेफर्डला आयपीएल 2022 च्या लिलावात तब्बल 7.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. परंतु त्याला त्याच्या पदार्पणाच्या हंगामात फक्त तीनच खेळ खेळता आले. त्यानंतर लखनऊने रोमॅरियो शेफर्डला 50 लाखाच्या किमतीत खरेदी केलं. मात्र, त्याला मागील हंगामात फक्त एक सामना खेळता आला. त्यानंतर आता यंदाच्या ट्रेड विन्डोमध्ये मुंबईने शेफर्डचं कर्तृत्व ओळखलं अन् नवा पोलार्ड तात्या संघात घेतला होता. 

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.