IPL 2020 सुरु होण्यापूर्वीच मुंबईच्या संघाला धक्का

संघाच्या अडचणी वाढू शकतात.... 

Updated: Mar 10, 2020, 02:19 PM IST
IPL 2020 सुरु होण्यापूर्वीच मुंबईच्या संघाला धक्का  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुंबईच्या संघाला IPL 2020 आयपीएल सुरु होण्यारपूर्वीच धक्का बसला आहे. ज्यामुळे येत्या काळात आयपीएलच्या हंगामात संघाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. ही आव्हानं यासाठी कारण, संघातील अष्टपैलू खेळाडूलाच दुखापतीच्या कारणाने या स्पर्धेतून माघार घ्यावी लागण्याची चिन्हं स्पष्टपणे दिसत आहेत. 

मुंबईच्या संघातील फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या विभागात दमदार कामगिरी करत क्रीडारसिकांची मनं जिंकणारा, मुळचा वेस्ट इंडिजचा असणारा खेळाडू कायरन पोलार्ड दुखापतग्रस्त झाला आहे. परिणामी त्याने पाकिस्तान प्रिमीयर लीगमधून पूर्णपणे माघार घेतली आहे. 

मुख्य म्हणजे इंडियन प्रिमीयर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठीसुद्धा पोलार्डला सावरण्यासाठी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या संघासाठीसुद्धा हा एक धक्काच असणार आहे. एकिकडे मुंबईच्या संघाला पोलार्डच्या खेळण्याविषयीची साशंकता लागलेली आहे. त्याच्या नसण्याने संघाला मोठा फटका बसू  शकतो हे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. तर, दुसरीकडे कोरोना व्हायरसचं सावटही यंदाच्या आयपीएलच्या संघावर पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 

A post shared by Pakistan Super League (@thepsl) on

'या' मंदिरात दिला जातो मटण बिर्याणीचा प्रसाद

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारतातही याविषयी दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर आयपीएलचे सामनेही पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेव्हा आता येत्या काळात आयपीएल ठरलेल्या कालावधीतच पार पडणार की, स्पर्धेच्या तारखांमध्ये बदल केले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.