MI vs GT IPL 2023 Highlights: मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) विरूद्ध गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईने गुजरातचा ( Mumbai Indians Beat Gujarat Titans ) दारूण पराभव केला आहे. मुंबईने 27 रन्सने गुजरातला पराभवाची धुळ चारलीये. या विजयासह रोहित सेनेने गेल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढला. याशिवाय मुंबईच्या पलटणने पुन्हा एकदा पॉईंट्स ( IPL points table ) टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीये. तर गुजरात तिच्या पहिल्या स्थानावर कायम आहे.
वानखेडेवरील सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि इशान किशन फलंदाजीला आले होते. यावेळी दोघांनी चांगले फटके मारून सुरुवात केली, मात्र रोहित शर्मा 29 रन्सवर बाद झाला. यानंतर इशान किशन देखील 31 रन्स करून माघारी परतला. नेहल वढेरालाही मोठी खेळी करता आली नाही. मात्र मिस्टर 360 डिग्री म्हणजेच सूर्यकुमार यादवच्या खेळीच्या जोरावर मुंबईने 200 पार स्कोर केला.
वानखेडेच्या मैदानावर आज मुंबईकरांना मिस्टर 360 डिग्री फलंदाजी पहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममुळे सूर्यावर टीका होताना दिसत होती. अखेर सूर्याने गुजरातविरूद्ध त्याचं खरं रूप दाखवून दिलं. आजच्या सामन्यात सूर्याने 49 बॉल्समध्ये 103 रन्सची नाबाद खेळी केली. यावेळी त्याने 11 फोर आणि 6 सिक्स लगावले होते. 210.20 च्या स्ट्राईक रेटने सूर्याने फलंदाजी केली. सूर्याचं आयपीएलमधलं हे पहिलंच शतक होतं.
मुंबईने 20 ओव्हर्समध्ये 218 रन्स केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या टीमला 7 रन्सवरच पहिला धक्का बसला. ओपनर वृद्धिमान साहा 2 रन्सवर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल देखील स्वस्तात पव्हेलियनमध्ये गेले. डेविड मिलर आणि विजय शंकरने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले. मात्र यामध्ये गुजरातचा गोलंदाज राशीद खानने आज उत्तम फलंदाजी केली.