सचिन तेंडुलकरचा मिसळीवर ताव! मुंबई इंडियन्सने वाढवला 'मिसळीचा भाव'

महाराष्ट्रात कुठे मिळते सर्वात चांगली मिसळ? तुम्हाला काय वाटतं

Updated: Dec 12, 2021, 07:17 PM IST
सचिन तेंडुलकरचा मिसळीवर ताव! मुंबई इंडियन्सने वाढवला 'मिसळीचा भाव' title=

मुंबई: मिसळ कुणाला आवड नाही? मिसळ म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. गरम गरम मिसळ पाहून तर मास्टर ब्लास्टर सचिनचा मोह देखील आवरेनासा झाला. सचिननंने मिसळीवर ताव मारला आहे. यावेळी महाराष्ट्राची मिसळ पाव म्हणजे एक नंबर असल्याचं त्याने म्हटलं आहे.

रविवार असो वा सोमवार मिसळ पाव मी कधीही खाऊ शकतो असं कॅप्शनही सचिनने दिलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्स संघाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मिसळ एक नंबर महाराष्ट्रात कुठे मिळते सर्वात चांगली मिसळ? असा प्रश्नही मुंबई इंडिन्सने कॅप्शनमध्ये विचारला आहे. यावर अनेक कमेंट्स येत असल्य़ाचं पाहायला मिळत आहे. 

मास्टर ब्लास्टर सचिनची खवय्येगिरी! मिसळ दिसताच तुटून पडला, पाहा व्हिडीओ