लेकसिटीच्या ‘जलपरी’ने मुंबईत रचला इतिहास, समुद्रात १० तासात पूर्ण केलं ४८ किमी अंतर

आता हा रेकॉर्ड तिने आपल्या नावावर केला आहे. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 6, 2018, 08:10 PM IST
लेकसिटीच्या ‘जलपरी’ने मुंबईत रचला इतिहास, समुद्रात १० तासात पूर्ण केलं ४८ किमी अंतर title=

मुंबई : लेकसिटी म्हणजेच उद्यपूरच्या गौरवी सिंघवीने मुंबईच्या जुहू बीचच्या खारदंडा ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतचा समुद्रांच्या लाटांवत लगातार ९ तास २३ मिनिटे स्विमिंग करत ४७ किमी अंतर पार केलं. आता हा रेकॉर्ड तिने आपल्या नावावर केला आहे. 

स्विमींग पूर्ण केला ४७ किमी प्रवास

गौरवी सिंघवीने सकाळी साधारण ३ वाजून ३० मिनिटांनी समुद्रात डुबकी घेतली. दुपारी साधारण १.३० वाजता ती ४७ किमी अंतर पूर्ण करून गेटवे ऑफ इंडियाला जाऊन थांबली. हा रेकॉर्ड केला तेव्हा गौरवीचे कुटुंबिय आणि तिचे कोच उपस्थित होते. केवळ १४ वर्षाचं वय असताना हा रेकॉर्ड कायम करणारी गौरवी पहिली स्विमर आहे. 

याआधी केला होता रेकॉर्ड

गौरवी जेव्हा गेटवे ऑफ इंडियाला पोहोचली तेव्हा तिचं स्वागत करण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री स्वत: उपस्थित होते. गौरवी याआधी अरबी समुद्राच्या लाटांसोबत खेळली आहे. याआधी गौरवीने समुद्रात लगातार ३६ किमी स्विमींग केलं होतं. 

बालपणापासून स्विमींग

गौरवीने वयाच्या तिस-या वर्षापासूनच स्विमींग सुरू केलं होतं. गौरवीची आई शुभ सिंघवी यांनी सुरूवातीला तिला ट्रेनिंग दिलं होतं. गौरवीचं पुढील लक्ष्य इंग्लिश चॅनेल आहे. गौरवी म्हणाली की, इंग्लिश चॅनेल पार करण्यासाठी तिचं वय आडवं येतंय. वयाची सीमा पार केल्यानंतर ती यासाठी सज्ज असेल.