Mukesh Kumar Viral Video: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) या दोन्ही संघात पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्कमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा याने नवा डाव आखला. मुकेश कुमार (Mukesh Kumar) या नव्या गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आलं. आर आश्विनकडून मुकेश कुमार याला कॅप देण्यात आली. त्यावेळी मुकेशचा आनंद सातव्या आसमानावर होता. अशातच पहिल्या दिवसाच्या खेळानंतर मुकेश कुमार याने आईला फोन (Mukesh Kumar calling his mother) करून आनंदाची बातमी दिली. त्यावेळचा एक व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे.
आई, तू इतकी वर्षे पूजा करत होतीस, त्याचं फळ मला मिळालं आहे. आज मला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली, असं मुकेशने आपल्या आईला सांगितलं. लेकाचे हे शब्द ऐकताच मुकेशच्या आईने त्याला आशीर्वाद दिला. बेटा तू खूप पुढे गेला आहेस अन् असाच पुढं जा, असं म्हणत त्याच्या आईने त्याला आशीर्वाद दिले. मुकेश आणि आईने त्यांच्या भोजपुरी या बोलीभाषेत संवाद साधला. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भोजपुरी भाषेत दोघांचं नेमकं काय बोलणं झालं? यावर मुकेशने स्पष्टीकरण दिलं. तू नेहमी आनंदी राहा आणि पुढे जा, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत, असं आई म्हणाली. माझ्या आईला माहित नाही की भारताशी खेळणं ही किती मोठी गोष्ट आहे, पण ती फक्त एवढंच म्हणाली की तू पुढे जात रहा, आईशी झालेलं बोलणं सांगताना मुकेश भावूक झाल्याचं दिसून आलं.
दरम्यान, मुकेश कुमार बिहारच्या गोपालगंज गावात राहतो. मुकेशला टीम इंडियामध्ये प्रवेश करण्यासाठी खूप कठोर परिश्रम घ्यावं लागलं. वडिलांनी रिक्षाचालक असल्याने त्याच्या आयुष्यातीस संघर्ष कमी नव्हता. कठीण परिश्रमावर मात करून त्याच्या वडिलांनी मुकेशला इथपर्यंत पोहोचवलं. 29 वर्षीय मुकेश कुमार बंगालकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. त्यानंतर आता तो टीम इंडियाकडून खेळताना दिसत आहे.