MS Dhoni: 'आधी धोनी मग जड्डू' पण गणित काय जमेना, आता 'हा' खेळाडू करणार चेन्नईचं नेतृत्व!

IPL 2023 CSK Captain : मागील आयपीएल हंगामात धोनीने (MS Dhoni) चेन्नईचं नेतृत्व सोडलं. त्यानंतर चेन्नईची जबाबदारी रविंद्र जडेजाकडे (Ravindra jadeja) सोपवण्यात आली. मात्र...

Updated: Nov 16, 2022, 05:56 PM IST
MS Dhoni: 'आधी धोनी मग जड्डू' पण गणित काय जमेना, आता 'हा' खेळाडू करणार चेन्नईचं नेतृत्व! title=
Chennai Super Kings

Chennai Super Kings: बीसीसीआयच्या (BCCI) निर्देशानंतर सर्व संघांनी रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. 10 संघांनी एकूण 85 खेळाडूंना रिलीज केलं आहे. त्यामुळे आता कोची येथे मिनी ऑक्शनची जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसतंय.16 व्या हंगामासाठी (IPL Retention 2023) येत्या 23 डिसेंबरला आयपीएलचा मिनी लिलाव (IPL Auction) पार पडेल. अशातच आता (csk new captain) कडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. (MS Dhoni will be captain of Chennai Super Kings in ipl 2023 says ceo ks viswanathan)

चेन्नई सुपर किंग्सने पुढील वर्षी होणाऱ्या IPL 2023 हंगामासाठी आपल्या कर्णधाराच्या (Chennai Captain) नावाची घोषणा केली आहे. मागील आयपीएल हंगामात धोनीने चेन्नईचं नेतृत्व सोडलं. त्यानंतर चेन्नईची जबाबदारी रविंद्र जडेजाकडे (Ravindra jadeja) सोपवण्यात आली. मात्र, मध्यातच जडेजाने कॅप्टनसी सोडल्याने धोनीवर पुन्हा जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे चेन्नईच्या कॅप्टनसीचं सुत्र काही केल्या जुळत नसल्याचं दिसत होतं. अशातच आता चेन्नईच्या कॅप्टनच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

चेन्नईची मोठी घोषणा -

चेन्नई सुपर किंगचे सीईओ (CSK CEO) केएस विश्वनाथन (KS Viswanathan) यांनी मोठी घोषणा केली आहे. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) संघाचं नेतृत्व करणार आहे आणि तो संघासाठी मोठं योगदान देईल हे सर्वांनाच ठाऊक आहे, असं केएस विश्वनाथन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता चेन्नई यंदा धोनीच्याच नेतृत्वाखाली खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा - MI retained players 2023: मुंबई इंडियन्सने दिला तब्बल 13 खेळाडूंना नारळ! वाचा कोण IN कोण OUT?

दरम्यान, खेळाडूंच्या रिलीज केल्यावर विश्वनाथन (KS Viswanathan on release players) यांनी भावूक वक्तव्य केलं. हा निर्णय आमच्यासाठी खूप कठीण होता. त्यांनी संघासाठी मोठं योगदान दिलंय. त्यांसाठी तो क्षण खूप भावूक राहिलाय, असंही ते यावेळेस म्हणाले आहेत. महेंद्रसिंह धोनी आयपीएलनंतर (MS Dhoni IPL 2023) निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता चेन्नईचं आगामी नेतृत्वाविषयी सवाल उपस्थित केले जात आहेत.