... म्हणून महेंंद्रसिंग धोनीने 'पद्मभूषण' पुरस्कार लष्करी गणवेशात स्वीकारला

भारतीय क्रिकेट संघाचा 'कूल' कॅप्टन म्हणून ओळखला जाणार्‍या महेंद्रसिंग धोनीचा नुकताच पद्मभूषण पुरस्काराने सन्मान झाला. 

Updated: Apr 4, 2018, 08:15 AM IST
... म्हणून महेंंद्रसिंग धोनीने 'पद्मभूषण' पुरस्कार लष्करी गणवेशात स्वीकारला  title=

 मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा 'कूल' कॅप्टन म्हणून ओळखला जाणार्‍या महेंद्रसिंग धोनीचा नुकताच पद्मभूषण पुरस्काराने सन्मान झाला. दिल्लीत राष्ट्रपती भावनामध्ये सोमवारी (2 एप्रिल) राष्ट्रपती रामनाथ कोविंदच्या हस्ते धोनीला पुरस्कार देण्यात आला. महेंद्रसिंग धोनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी लष्कराच्या युनिफॉर्ममध्ये आला होता. धोनी लष्कराच्या गणवेशात का आला ? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांसोबतच अनेकांच्या मनात आला असेल. धोनीने या तुमच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.  

काय आहे कारण  ? 

महेंद्रसिंह धोनी नेमका लष्करी अधिकार्‍यांच्या गणवेशामध्ये का आला ? या प्रश्नाच्या उत्तराचे संकेत धोनीने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरून दिले आहेत. 

लष्करी गणवेशामध्ये पुरस्कार स्वीकारल्याने त्याचा आनंद अनेक पटींनी वाढला आहे. देशासाठी प्राणाची बाजी लावणार्‍या भारतीय जवानांचे आणि त्यांच्या परिवाराचे आभार. त्यांच्यामुळेच आम्ही सुरक्षित आहोत.  

 

तिसरा मानाचा पुरस्कार  

'पद्मभूषण' हा भारतील तिसरा मोठा नागरिक सन्मान आहे. महेंद्र सिंग धोनीला लेफ्टिनेंट कर्नल ही सन्मानपूर्वक उपाधी देण्यात आली आहे. ही उपाधी मिळवणारा कपिल देव यांच्यानंतर धोनी हा दुसरा क्रिकेटर ठरला आहे.धोनीला सेनेच्या वर्दीत पाहून सेहवागवरही चढला देशभक्तीचा रंग...

 
धोनीला यापूर्वी मिळाले हे पुरस्कार

महेंद्रसिंग धोनीला २००७ मध्ये देशातील सर्वोच्च खेळ सन्मान राजीव गांधी खेलरत्न तर २००९ मध्ये देशातील चौथा सर्वोच्च नागरिक सम्मान पद्मश्री देण्यात आला आहे.