MS Dhoni Production Film : धोनीच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर, थाला माहीची नवी इनिंग सुरू!

Dhoni Entertainment Pvt Ltd: आगामी आयपीएलच्या हंगामानंतर धोनी निवृत्ती घेईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आयपीएलला टाटा करण्यापूर्वी धोनीने चित्रपट निर्मितीत (MS Dhoni production movie) पाऊल टाकले आहे. 

Updated: Jan 27, 2023, 11:17 PM IST
MS Dhoni Production Film : धोनीच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर, थाला माहीची नवी इनिंग सुरू! title=
Dhoni Entertainment Pvt Ltd

MS Dhoni production lets get married : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) क्रिकेटमध्ये खूप नाव कमावलं. महेंद्रसिंह धोनी हा जगातील महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. टीम इंडियाला तीन आयसीसीच्या ट्रॉफ्या जिंकवून देऊन नव्या उंचीवर पोहचवण्याचं काम धोनीने केलंय. दोन वर्षापूर्वी धोनीने निवृत्ती घेतली. त्यानंतर धोनी काय करणार?, असा सवाल विचारला जात होता. त्याचं उत्तर धोनीने दिलं आहे. थाला माहीने नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. (ms dhoni production movie lets get married announcess before ipl 2023 ms dhoni debut production tamil film announces)

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली असली तरी धोनी अजूनही आयपीएल (ipl 2023) खेळतो. आगामी आयपीएलच्या हंगामानंतर धोनी निवृत्ती घेईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आयपीएलला टाटा करण्यापूर्वी धोनीने चित्रपट निर्मितीत (MS Dhoni production movie) पाऊल टाकले आहे. धोनी एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या पहिल्या चित्रपटाचं (MS Dhoni Production Film) मोशन पोस्टर शुक्रवारी प्रदर्शित झालंय.

आणखी वाचा - MS Dhoni: धोनीला पाहताच पांड्याने घातला ड्रेसिंग रूममध्ये राडा? नेमकं काय घडलं? पाहा Video

महेंद्रसिंग धोनीने 'धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड'च्या प्रोडक्शन हाऊसच्या 'एलएसजी: लेट्स गेट मॅरीड' नावाच्या (lets get married) पहिल्या चित्रपटाची घोषणा केलीये. लेट्स गेट मॅरीड हा एक तमिळ चित्रपट (Tamil movies) आहे, जो लवकरच चित्रपटगृहात दाखल होईल. प्रोडक्शन हाऊसच्या अधिकृत हँडलवर चित्रपटाचा टायटल लूक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलाय.

पाहा Video - 

दरम्यान, इव्हाना (ivana) या चित्रपटात मुख्य अभिनेत्री असणार आहे. तसेच हरीश कल्याण (Harish Kalyan) देखील मुख्य भूमिकेत दिसतील. रमेश थमिलमणी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. अत्यंत कमी बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रोडक्शन हाऊसने (Dhoni Entertainment Pvt Ltd) आतापर्यंत 3 लघुपट बनवले आहेत. त्यानंतर आता हाऊसने मोठं पाऊल उचललंय.