नवी दिल्ली : महेद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईचा संघ आयपीएलच्या ११ व्या सीझनमध्ये चमकदार कामगिरी करतोय. धोनीदेखील आपल्या टीमसाठी वेळेला धावून जात रन्सचा पाऊस पाडत आहे. त्यामुळे स्टेडियममध्ये धोनी धोनी असा आवाज घुमत असतो. जगभरातील धोनीचे चाहते त्याच्या खेळीमुळे आनंदात आहेत. दरम्यान पाकिस्तानी महिला पत्रकाराला धोनीची तारीफ करण महागात पडलय. धोनीच्या खेळीने प्रभावित होऊन तिने ट्विट केलं. 'महेंद्रसिंग धोनी आजही बेस्ट फिनिशर आहे. जगाने लक्षात ठेवाव. काय शानदार शॉट आहे.' असं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. जैनब अब्बास अस या महिला पत्रकाराच नाव आहे.
पण जैनबने जेव्हा धोनीची तारीफ केली तेव्हा पाकिस्तानी फॅन्स तिच्यावर चांगलेच भडकले आणि तिला ट्रोल करु लागले. एवढच नव्हे तर रशिद खानची तारीफ केल्यानंतरही जैनबला पाकिस्तानींच्या रागाचा सामना करावा लागला. आयपीएल प्रमोट करण्यासाठी पाकिस्तान्यांनी तिला ट्रोल केलं.
धोनीने कॅप्टन म्हणून टी २० मध्ये ५ हजार रन्स पूर्ण केले. ३६ वर्षाच्या धोनीने बंगळूरविरुद्ध ७० रन्सची नाबाद खेळी केली.