धोनीला नव्हता विराट कोहलीवर विश्वास, माजी निवडकर्त्याच्या दाव्याचा 'तो' किस्सा

Kohli and Dhoni: एन श्रीनिवासन इतके संतप्त झाले की वेंगसरकर यांना मुख्य निवडकर्त्याच्या पदावरून हटवण्यात आले.

Pravin Dabholkar | Updated: Jun 22, 2023, 09:00 PM IST
धोनीला नव्हता विराट कोहलीवर विश्वास, माजी निवडकर्त्याच्या दाव्याचा 'तो' किस्सा title=

Kohli and Dhoni:  विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात आज खूप घट्ट नाते आहे. हे नाते इतके घट्ट आहे की,  धोनीला मित्र आणि मोठा भाऊ असे कोहली अनेकदा सांगताना दिसतो. मात्र, एक वेळ अशी होती की, माजी भारतीय कर्णधार धोनी हा विराटला संघात घेण्याच्या बाजूने नव्हता. माजी मुख्य निवडकर्ता दिलीप वेंगसरकर यांनी असा दावा करून खळबळ उडवून दिली होती. वेंगसरकर म्हणतात की, विराट कोहलीच्या जागी सीएसकेचा खेळाडू एस बद्रीनाथला संघात घेतल्यानंतर एन श्रीनिवासन इतके संतप्त झाले की वेंगसरकर यांना मुख्य निवडकर्त्याच्या पदावरून हटवण्यात आले.

धोनीला विराट कोहलीच्या जागी एस बद्रीनाथ हवा होता

महेंद्रसिंग धोनी विराट कोहलीचा टीम इंडियात समावेश करण्याच्या बाजूने नव्हता. मात्र, नंतर धोनी आणि विराटमध्ये खूप घट्ट नाते निर्माण झाले. त्यावेळी भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता असलेले दिलीप वेंगसरकर यांनी हा दावा केला होता. 

वेंगसरकर म्हणाले होते की, 2008 च्या अंडर-19 विश्वचषकातील विराट काहलीच्या कामगिरीने मी खूप प्रभावित झालो होतो आणि त्याला संघात समाविष्ट करायचे होते. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि बीसीसीआयचे खजिनदार एन श्रीनिवासन कोहलीला संघात घेण्याच्या बाजूने नव्हते. दोघांनाही कोहलीच्या जागी तामिळनाडूचा फलंदाज एस बद्रीनाथला संघात घ्यायचे होते. वेंगसरकर तर म्हणतात की कोहलीला संघात घेतल्याने त्यांना मुख्य निवडकर्ता पद गमवावे लागले.

एस बद्रीनाथ 29 वर्षांचा असून त्यांला संधी मिळाली नसल्याचे श्रीनिवासन म्हणाले. यानंतर श्रीनिवासन यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि काही दिवसांनी वेंगसरकर यांना मुख्य निवड समितीच्या पदावरून हटवण्यात आले. काही दिवसांपूर्वी 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेल्या वेंगसरकर यांनी सध्याच्या निवड समितीवर नाराजी व्यक्त करत खेळाडूंच्या निवडीबाबत दूरदृष्टी नसल्याचे म्हटले होते.