मुंबई टीमच्या नावावर 15 वर्षांतला सर्वात लाजीरवाणा रेकॉर्ड

कोलकाता विरुद्ध पराभवानंतर मुंबईने आपल्या नावे लाजीरवाणा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. मुंबईने पहिल्यांदाच एवढे सामने गमवले आहेत.

Updated: May 10, 2022, 04:12 PM IST
मुंबई टीमच्या नावावर 15 वर्षांतला सर्वात लाजीरवाणा रेकॉर्ड title=

मुंबई : आयपीएलमध्ये  5 ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईची मात्र यंदा पंधराव्या हंगामात वाईट कामगिरी राहिली आहे. डी वाय पाटील स्टेडियममध्ये कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाताने 52 धावांनी मुंबईचा पराभव केला. मुंबईचा यंदाच्या हंगामात 9 वा पराभव आहे. पॉईंट टेबलमध्ये मुंबई शेवटून पहिलं आहे. 

कोलकाता विरुद्ध पराभवानंतर मुंबईने आपल्या नावे लाजीरवाणा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. मुंबईने पहिल्यांदाच एवढे सामने गमवले आहेत.  2009, 2014 आणि 2018 हंगामात 8 सामने गमवले होते. तर 2012, 2016 आणि 2021मध्ये प्रत्येकी 7 सामने गमवले होते. 

मुंबईने 11 पैकी 9 सामने गमवले आहेत. तर दोन सामने जिंकण्यात यश आलं आहे. आतापर्यंत एवढी वाईट कामगिरी मुंबईने कधीही केली नाही. पहिल्यांदाच 9 सामने गमवून लाजीरवाणा विक्रम मुंबईने केला आहे. 

आयपीएलमध्ये 5 ट्रॉफी जिंकणारी टीम मुंबई यंदाच्या हंगामात मात्र अत्यंत वाईट कामगिरी करताना दिसत आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि मुंबई टीमने पुन्हा चाहत्यांची निराशा केली. कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई टीमचा 52 धावांनी लाजीरवाणा पराभव झाला. 

कर्णधार रोहित शर्माने पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं. तर वेगवान बॉलर्स जसप्रीत बुमराहचं तोंडभरुन कौतुक केलं. बुमराहने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये प्लेऑफची स्वप्नही दूर राहिली आहेत. यंदा मुंबई टीमने मोठी निराशा केली आहे.