FIFA World Cup 2022 : टीम छोटी, मन मोठं; मोरोक्कोच्या टीमने बक्षीस रकमेवर सोडलं पाणी

या वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मोरोक्कोच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. 

Updated: Dec 27, 2022, 05:57 PM IST
FIFA World Cup 2022 : टीम छोटी, मन मोठं; मोरोक्कोच्या टीमने बक्षीस रकमेवर सोडलं पाणी title=

Morocco Football Team Donating Prize money : फिफा वर्ल्डकपचा (Fifa World cup) शेवट अखेर गोड झाला. वर्ल्ड कप जिंकून अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न पूर्ण झालं. अर्जेंटीनाच्या फुलबॉल टीमने वर्ल्डकप जिंकला मात्र, मोरक्कोने (Morocco Football Team) सर्व चाहत्यांची मनं जिंकली आहे. या वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मोरोक्कोच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. 

मेस्सीच्या अर्जेंटीनाने वर्ल्डकपच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. तर दुसरीकडे वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मोरोक्को टीमच्या खेळाडूंनी वर्ल्डकपमध्ये मिळालेल्या बक्षीसाचे पैसे दान केलं आहे. वर्ल्डकपमध्ये मिळालेली रक्कम गरिबांना दान करण्याच्या निर्णय मोरोक्कोच्या टीमने घेतलाय.

गरीबांमध्ये दान केली रक्कम

ही थोडी थोडकी रक्कम नसून 22 मिलियन डॉलर्स म्हणजेच 181 कोटी रुपये इतकी आहे. ही सर्व रक्कम मोरक्कोच्या टीमने दान केल्याने त्यांनी सर्वांची मनं जिंकली आहेत. 

एका अहवालानुसार, मोरोक्कोच्या टीमला फिफा वर्ल्डकपमध्ये क्वालिफाय केल्यानंतर 2.5 मिलियन डॉलर्स म्हणून बक्षीस घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर मोरोक्कोने या स्पर्धेमध्ये चौथं स्थान पटकावलं. त्यामुळे त्यांना प्राई म्हणून 22 मिलियन डॉलर्स देण्यात आले. त्यानंतर टीमने ही सर्व रक्कम गरिबांमध्ये दान केलीये.

मोरोक्कोचा फिफामधील प्रवास

यंदाच्या फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये मोरोक्कोचा प्रवास अगदी स्वप्नवत राहिला. कतारमध्ये 28 दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेत एकूण 64 सामने खेळवले गेले. या स्पर्धेमध्ये क्रोएशियाने तिसरा क्रमांक पटकावला. तर मोरोक्कोला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटीनाचा विजय

सर्वात रोमहर्षक आणि अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या फायनलमध्ये अर्जेंटीनाने थरारक विजय मिळवलाय. फिफाच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली आणि 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. अर्जेंटिनासाठी मेस्सी (Lionel Messi) आणि डी मारियाने पहिल्या हाफमध्ये दोन गोल करत विजयी आघाडी घेतली. तर अखेरीस अर्जेंटिनाने 4-2 (Argentina vs France) असा विजय साकारत तिस-यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.