IND vs NZ: टी 20 सीरिजच्या दुसऱ्या सामन्यातून मोहम्मद सिराज बाहेर?

IND vs NZ: टी 20 सीरिजच्या दुसऱ्या सामन्यासाठी या नव्या खेळाडूला डेब्यू कऱण्याची मिळणार संधी?

Updated: Nov 18, 2021, 06:24 PM IST
IND vs NZ: टी 20 सीरिजच्या दुसऱ्या सामन्यातून मोहम्मद सिराज बाहेर?  title=

जयपूर: न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने 5 विकेट्सने पराभव केला आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 165 धावांचं लक्ष्य टीम इंडियासमोर ठेवलं होतं. हे लक्ष्य टीम इंडियाने 5 विकेट्स राखून पूर्ण केलं आहे. आता दुसऱ्या टी 20 सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 

पहिल्या सामन्यामध्ये मोहम्मद सिराजच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे तो खाली बसला. हाताला दुखापत झाली तरी त्याने मैदान सोडलं नाही. उलट तो पुन्हा हाताला मलमपट्टी करून मैदानात खेळण्यासाठी उतरला. दुसऱ्या टी 20 सामन्यातून मोहम्मद सिराजला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. 

रचिन रवींद्रला मोहम्मद सिराजने आऊट केलं. तर त्याने 4 ओव्हरमध्ये न्यूझीलंडला 39 धावा दिल्या आहेत. दुसऱ्या टी 20 सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. 

दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी दिनेश कार्तिक किंवा हर्षल पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या दोघांपैकी कोणाला निवडायचं असा प्रश्नही निवड समितीसमोर अडणार आहे. 

दिनेश कार्तिकची निवड केली तर फलंदाज जास्त आणि बॉलर्स चार होतील तर हर्षल पटेलची निवड केली तर पाच बॉलर्स होणार आहेत. त्यामुळे रोहित शर्मा दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी काय बदल करतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टीम इंडिया स्क्वाड

रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीप), के एल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, आर अश्विन, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, इशान किशन, व्यंकटेश अय्यर ऋतुराज गायकवाड.

न्यूझीलंड स्क्वाड

 टिम साउथी (कर्णधार), टिम सीफर्ट (विकेटकीपर), मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सॅन्टनर, लॉकी फर्ग्युसन, काइल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, ईश सोधी, टॉड अॅस्टल, अॅडम मिल्ने.