भारतीय क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी हा सध्या आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मायदेशात पराभूत करणाऱ्या टीम इंडियाचा शमी एक भाग होता. मोहम्मद शमीने टीम इंडियामध्ये पुनरागमन केलंय. चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी सांगितले की, सप्टेंबरपासून टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमचा शमी एक भाग असेल. पण या सगळ्या सकारात्मक बातम्यांमध्ये शमीबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हा खुलासा मोहम्मद शमीच्या आत्महत्येच्या विचारांशी निगडीत आहे. हा खुलासा शमीचा अगदी जवळचा मित्र आणि टीम इंडियाचा खेळाडू उमेश कुमारने केला आहे.
मोहम्मद शमीच्या अगदी जवळचा खेळडू उमेश कुमारने शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये याबाबत खुलासा केला आहे. जेव्हा शमी एका बाजूला मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकला तर दुसरीकडे पत्नीकडून घरगुती हिंसाचाराचा देखील आरोप करण्यात आला होता. यावेळी शमी आतून पूर्णपणे कोलमडून गेला होता. उमेश यादवने त्यावेळची शमीची अवस्था पॉडकास्टमध्ये सांगितली. शमीची मानसिक स्थिती बिघडली असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं.
उमेशने सांगितलं की, शमी त्या काळात माझ्याच घरी राहत होता. शमी त्यावेळी अनेक गोष्टींशी दोन हात करत होता. पण पाकिस्तानसोबत मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप त्याला आतून हादरवणारा होता. या काळात त्याची रात्रीची झोप आणि मानसिक स्थिती दोन्ही बिघडली होती. या आरोपामुळे तो पूर्पणे कोलमडून गेला होता. उमेश म्हणाला की, शमी त्यावेळी काहीही सहन करु शकत होता पण देशासोबत गद्दारी हा आरोप त्याला सहनही होत नव्हता आणि मान्यही नव्हता.
उमेश कुमारने सांगितलं की, मॅच फिक्सिंगच्या आरोपाच्या रात्री शमी अस्वस्थ होता. तो स्वतःला संपवून टाकण्याचा विचार रपकत होता. उमेशच्या माहितीनुसार, पहाटेचे 4 वाजले असतील जेव्हा मी पाणी प्यायला उठलो. तो किचनकडे जात होता तेव्हा शमी 19 व्या मजल्याच्या बाल्कनीत उभा होता. मी समजून गेलो की, त्याच्या डोक्यात काय सुरु आहे. ती रात्र शमीसाठ अतिशय कठिण आणि भयानक होती.
उमेशने पॉडकास्टमध्ये असेही म्हटले की, एका दिवसानंतर शमीच्या मोबाईलवर एक मॅसेज आला की, त्याला क्लीन चिट मिळाली आहे, त्याला किती आनंद झाला असेल याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. तो आनंद त्याच्यासाठी विश्वचषक जिंकल्यासारखा होता. ते अजिबात कमी नव्हते.