Mohammed Shami ankle injury : टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्टार गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या 10 महिन्यांपासून संघातून बाहेर आहे. वनडे वर्ल्ड कपमधील अभूतपूर्वी कामगिरीनंतर मोहम्मद शमीची घोट्याची शस्त्रक्रिया झाली. दुखापतीतून सावरत असताना शमीने क्रिकेटचा सराव मात्र थांबवला नाही. शमी खुर्चीवर बसून गोलंदाजीचा सराव करत होता. आता शमी नेट्समध्ये सराव करताना दिसतोय. हळूहळू त्याने बॉलिंगचा सराव देखील सुरू केला आहे. तर फलंदाजीचा सराव करतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. अशातच आता शमी टीम इंडियामध्ये एन्ट्री कधी करणार? असा सवाल विचारला जात आहे.
श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये बुमराह आणि शमी नसल्याने टीम इंडियाला मजबूत फटका बसला. अशातच शमीच्या पुनरागमनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेत शमी संघात पुनरागमन करू शकतो. श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी शमीने गोलंदाजी सुरू केल्याची पुष्टी केली होती. त्यामुळे शमी आता लवकरच टीम इंडियामध्ये सामील होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मोहम्मद शमी वनडे आणि टेस्टमध्ये पुनरागमन करू शकतो.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद शमीने फिटनेसवर मोठं वक्तव्य केलं होतं. रिकव्हरी खेळाडूच्या जीवनाचा भाग असतो. माझा प्रयत्न आहे की, मी रिकव्हरीचे माझे व्हिडीओ शेअर करत असतो, तरी देखील लोकांचं एवढं प्रेम आहे की, त्यांना अजून माहिती पाहिजे असते. चाहत्यांचं प्रेम माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी लवकर फिट होण्याचा प्रयत्न करतोय, असं मोहम्मद शमीने म्हणाला होता.
दरम्यान, बॅटर्स तुम्हाला सामना जिंकवतात पण बॉलर्स तुम्हाला टुर्नामेंट्स जिंकवून देतात, असं म्हटलं जातं. मोहम्मद शमीने आपल्या चमकदार कामगिरीने टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये नेहमी विजयाच्या उंभरठ्यावर पोहोचवलं होतं. मागील तीन वर्ल्ड कपमधील 18 सामन्यात तब्बल 55 विकेट्स घेऊन मोहम्मद शमीने टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. याचीच दखल घेत भारत सरकारने मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.