नागपूर : ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेलीत पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारत लक्षवेधी विजयासह आयसीसी एकदिवसीय रॅंकींगमध्ये पुन्हा एकदा नंबर वन ठरण्याची शक्यत आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने मोठी प्रतिक्रीया दिली आहे.
उमेश यादवने म्हटले आहे की, या सामन्यात मला आणि माझ्यासोबतच मोहम्मत शमीला एक सीनिअर खेळाडू म्हणून मोठी जबाबदारी घ्यावी लागणार आहे. चौथ्या वनडे सामन्यात झालेल्या पराभवानंतरही भारतीय संघाचे मनोधौर्य चांगले राहिले आहे. पण, मला वाटते की, त्या सामन्यात आम्ही २० ते २५ धावा अधिकच दिल्या होत्या. शमी आणि मी बऱ्याच दिवसानंतर खेळलो. आता आम्हाला तेच काम करावे लागेल ज्याची संघ आमच्याकढून अपेक्षा ठेवतो, असेही यादवने म्हटले आहे.
या आधिच्या सामन्यात उमेशने चार बळी घेतले होते. पण, या बळींच्या बदल्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीचा चांगलाच फायदा उठवला. त्याच्याकढून अनेक धावा वसूल करण्यात आल्या.
दरम्यान, पुढे बोलताना उमेशने म्हटले आहे की, 'एक दिवसीय सामन्यात तुमच्याकडे रणनिती आखायला जास्त वेळ नसतो. आणि माझ्या क्रिकेट कारकिर्दीवर कटाक्ष टाकता मला वाटते की, मला ज्या फॉर्मेटमध्ये खेळण्याची संधी मिळते आहे त्या फॉर्मेटमध्ये मी खेळायला हवे.'