रविचंद्रन आश्विनचा निशाणा कोणावर? म्हणतो 'मी टॅटू असलेला खेळाडू नसलो तरी..'

Ravichandran Ashwin Statement : आर. आश्विनने टीममध्ये संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

Updated: Sep 22, 2023, 06:53 PM IST
रविचंद्रन आश्विनचा निशाणा कोणावर? म्हणतो 'मी टॅटू असलेला खेळाडू नसलो तरी..' title=
Ravichandran Ashwin, IND vs AUS

IND vs AUS, R Ashwin : आगामी वर्ल्ड कपपूर्वीची (World Cup 2023) लिटमस टेस्ट म्हणून भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील वनडे सिरीजकडे पाहिलं जातंय. दोन्ही संघातील पहिल्या वनडे सामना मोहालीच्या मैदानात खेळवला गेला. पहिल्या सामन्यात मोहम्मद शमीने भेदक मारा केला. मात्र, केएल राहुलने संघात आर आश्विनला (Ravichandran Ashwin) संधी दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. अशातच आता बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आश्विनने टीममध्ये संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

नेमकं काय म्हणाला Ravichandran Ashwin?

गेल्या काही महिन्यांपासून मी वनडे सामना खेळण्यासाठी उत्सुक होतो. आता मला संधी मिळाली आहे. जेव्हा लोक तुमची खेळातील आकडेवारी आणि यशाबद्दल बोलतात आणि तुम्हाला वाटतं की मी काहीतरी साध्य केलं आहे, तेव्हा तुम्ही आणखी जोमाने गेम खेळण्यास सुरुवात करता. मी टॅटू असलेला खेळाडू नाही. मात्र, टॅटू माझ्या हृदयात आहे, असं म्हणत रविचंद्रन आश्विनने टोला लगावला आहे. 

जर टीम काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे, असं काही जे माझ्या दृष्टीकोनातून काहीतरी वेगळं आहे. टीम मॅनेजमेंटने मला त्यांच्या लुपमध्ये ठेवण्य़ाचा प्रयत्न केला आहे. संधी मिळू शकते, असं मॅनेजमेंटकडून सांगण्यात आलंय. जर मला खेळण्याची आणि संघासाठी योगदान देण्याची संधी मिळाली तर मला ते करण्यात अधिक आनंद होईल, असं रविचंद्रन आश्विन म्हणाला आहे.

पाहा Video

दरम्यान, 6 वर्षात फक्त 2 वनडे सामने खेळणारा अश्विन 21 महिन्यांनी टीम इंडियात परतला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली होती. मात्र, पीच पाटा असल्याने स्पिनर्सला मदत मिळाली नाही. तरी देखील आश्विनने चांगली गोलंदाजी करत कांगारूंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मार्नस लॅबुशेनला आश्विनने फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. या सामन्यात त्याने एक विकेट घेतली.

आणखी वाचा - IND vs AUS : शमीने केल्या स्मिथच्या बत्त्या गुल, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा Video

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (W), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (C), शॉन अॅबॉट, अॅडम झम्पा.

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C) इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.