मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार मिताली राजनं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मिताली राजच्या निवृत्तीमुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मिताली राज 23 वर्षे क्रिकेट खेळली आहे. 39 वर्षीय मिताली राजनं 14 जानेवारी 2002 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. मितालीनं भारतीय महिला क्रिकेट संघाला १९ वर्षे आणि २६२ दिवस दिले आहेत. इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना लखनऊ येथे खेळली होती. तर शेवटचा सामना 3 ऑक्टोबर 2021 ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. मिताली राजनं आतापर्यंत 12 कसोटी, 232 एकदिवसीय आणि 89 टी 20 सामने खेळली आहे.
मितालीने 12 कसोटी सामन्यात 699 धावा केल्या आहेत. त्यात 214 ही सर्वोत्तम खेळी होती. मितालीने कसोटी सामन्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकं झळकावली आहे. तर गोलंदाजी करताना 32 धावा दिल्या आहेत. मात्र कसोटीत तिला एकही गडी बाद करता आला नाही.
मिताली 232 एकदिवसीय सामने खेळली असून 7805 धावा केल्या आहेत. नाबाद 125 ही तिची सर्वोत्तम खेळी होती. एकदिवसीय कारकिर्दीत तिने 7 शतकं आणि 64 अर्धशतकं झळकावली आहेत. तर गोलंदाजी करताना 8 गडी बाद केले आहेत.
टी 20 प्रकारात मितालीने 89 सामने खेळले असून 2364 धावा केल्या आहेत. मितालीने 64 अर्धशतकं झळकावली आहेत. तर नाबाद 97 ही सर्वोत्तम खेळी होती.