Mitchell Starc : ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा (Mitchell Starc Mankading) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार स्पिरन दीप्ती शर्माचं (Deepti Sharma) नाव घेऊन नॉन-स्ट्रायकरच्या जोस बटलरला (jos buttler) इशारा देताना दिसत आहे. कॅनबेरा येथे शुक्रवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील अंतिम सामना खेळला गेला. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाची गोलंदाजी सुरू असताना ही घटना घडली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, पाचवी ओव्हर टाकण्यासाठी कॅप्टने स्टार्ककडे Mitchell Starc) बॉल सोपवला. पाचव्या ओव्हरमध्ये स्टार्क चौथा चेंडू टाकत असताना बटलरने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीज सोडली. अशा स्थितीत स्टार्कने सावध करत इशारा दिला. यादरम्यान, मी दीप्ती नाही, पण मी हे करू शकतो, असं स्टंप माइकवर (Stump Mike) बोलतानाही तो पकडला गेलाय.
आणखी वाचा - जेव्हा Babar Azam आणि Rohit Sharma समोरासमोर येतात, तेव्हा...; पाहा 'तो' व्हिडीओ
माजी भारतीय क्रिकेटर हेमांग बदानीने (Hemang Badani) स्टार्कच्या या कृतीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नॉन स्ट्रायकरच्या शेवटी फलंदाजाला बाद करायचं की नाही हा गोलंदाजाचा निर्णय असतो, पण या काळात दीप्तीचं नाव घेणं योग्य नव्हतं, असं बदानी म्हणाला आहे.
Grow up Starc. That’s really poor from you. What Deepti did was well within the rules of the game. If you only want to warn the non striker and not get him out that’s fine and your decision to make but you bringing Deepti into this isn’t what the cricket world expects of you https://t.co/vb0EyblHB8
— Hemang Badani (@hemangkbadani) October 15, 2022
दरम्यान, भारत-इंग्लंड महिला एकदिवसीय सामन्यात दीप्ती शर्माने इंग्लिश फलंदाजाला मंकडिंगद्वारे (Mankading) धावबाद केलं होतं, त्यामुळे इंग्लंडमध्ये बरीच चर्चा झाली होती. तर त्याआधी आयपीएलमध्ये (IPL) भारताचा स्टार स्पिनर आश्विनने (R Ashwin) मंकडिंगद्वारे इंग्लंडच्याच जॉस बिटलरला बाद केलं होतं. त्यामुळे बटलरचं नशिबच फुटकं, अशा कमेंट्स सध्या सोशल मीडियावर वाचायला मिळत आहेत. स्टार्कने दिलेल्या वॉर्निंगनंतर आता जॉस बटलरला पुन्हा आश्विनच्या रन आऊटचा क्षण आठवल्याशिवाय राहणार नाही.