AUS vs SA: बोट रक्तबंबाळ झालं असूनही गोलंदाजी करण्यासाठी उतरला Mitchell Starc!

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) ला झालेली दुखापत चर्चेचा विषय बनली होती. यावेळी त्याचं संपूर्ण बोट रक्तबंबाळ झालं होतं, मात्र इतकं असूनही तो मैदानावर खेळण्यासाठी उतरला होता.

Updated: Dec 29, 2022, 06:40 PM IST
AUS vs SA: बोट रक्तबंबाळ झालं असूनही गोलंदाजी करण्यासाठी उतरला Mitchell Starc! title=

Mitchell Starc bowls blood dripping Finger : ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवला जातोय. ऑस्ट्रेलियाच्या टीमने या सामन्यात मजबूत आघाडी घेतली आहे. कांगारूंच्या टीमने (Australia Team) 386 रन्सची आघाडी घेत 576 रन्सवर पहिला डाव घोषित केला केला. या दरम्यान वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) ला झालेली दुखापत चर्चेचा विषय बनली होती. यावेळी त्याचं संपूर्ण बोट रक्तबंबाळ झालं होतं, मात्र इतकं असूनही तो मैदानावर खेळण्यासाठी उतरला होता.

मिचेल स्टार्क (Mitchell Starc) चे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान यावेळी चाहते त्याच्या या कृत्याला सलाम करत होते.

रक्तबंबाळ झालं होतं Mitchell Starc चं बोट

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्याक वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) च्या बोटाला दुखापत झाली होती. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की, त्याच्या बोटातून रक्त येतं होतं. व्हायरल झालेल्या फोटोंमधून तुम्ही अंदाज लावू शकता, की त्याला किती मोठी दुखापत झाली असेल.

मुख्य म्हणजे बोट रक्तबंबाळ होऊन देखील तो गोलंदाजी करत होता. त्याचं हे धाडसी पाऊल पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. दरम्यान यावेळी काही चाहत्यांनी यावेळी भारतीय गोलंदाजांवर निशाणा साधला आहे. खासकरून जसप्रीत बुमराहला यावेळी ट्रोल करण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये

दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्स गमावून 576 रन्सवर डाव घोषित केला. यादरम्यान ओपनर डेव्हिड वॉर्नरने द्विशतक झळकावलं. तसंच स्टीव्ह स्मिथचं शतक अवघ्या 16 रन्सपासून दूर राहिलं. कॅरीने 111 रन्स केले तर कॅमेरून ग्रीनने 51 रन्सची नाबाद खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिक नॉर्टजेने सर्वाधिक 3 विकेट्स घेतलेत.

दुसरीकडे रबाडाने 2 तर यानसेन आणि एनगिडीला 1-1 विकेट मिळवण्यात यश आलं आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात करून दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी 1 विकेट गमावून 15 रन्स केले आहेत. कर्णधार डीन एल्गर शून्यावर कांगारू टीमचा कर्णधार पॅट कमिन्सचा बळी ठरलाय.