...म्हणून मिताली राजने केले कोहलीचे कौतुक!

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ही अत्यंत उत्तम खेळाडू आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 1, 2017, 11:21 AM IST
...म्हणून मिताली राजने केले कोहलीचे कौतुक! title=

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ही अत्यंत उत्तम खेळाडू आहे. महिला क्रिकेट संघाला महिला वर्ल्ड फायनलमध्ये पोहचवण्यात तिचा मोठा हात होता. 

तिची ही खिलाडू वृत्ती मैदानाबाहेर देखील दिसून येते. कारण त्याच  खिलाडू वृत्तीने तिने कोहलीचे कौतुक केले आहे.

कोहलीवर स्तुतीसुमने 

अलीकडेच तिने एका पुरस्कार सोहळ्यात वेगवेगळ्या विषयांवर आपले मत व्यक्त केले. तिने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर स्तुतीसुमने उधळली. ती म्हणाली की, "विराट कोहली सर्व टीमसाठी त्याचबरोबर महिला टीमसाठी देखील खूप प्रेरणादायी आहे. चांगली कामगिरी करण्यासाठी विराट नेहमीच प्रेरित करतो. त्यासाठी त्याचे खूप आभार आणि धन्यवाद."

सोशल मीडिया खूप महत्त्वाचं

मिताली म्हणाली की. "भारतात महिला क्रिकेटला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी सोशल मीडिया खूप महत्त्वाची भुमिका निभावत आहे. सोशल मीडियामुळे खेळ अत्यंत लोकप्रिय झाला आहे. मॅचच्या प्रसारणात देखील खूप फरक पडला आहे. आम्ही २००५ च्या महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये जागा निर्माण केली होती. मात्र आता ज्याप्रकारे महिला क्रिकेटकडे पाहिले जाते त्यात खूप बदल दिसून येतोय."