'आता आमच्या मुलाला आम्ही फार..', शाहिदच्या बायकोचा सुर्यकुमारबरोबरचा सेल्फी Viral; सूर्याचा भन्नाट रिप्लाय

Mira Rajput Shahid Kapoor Selfie With Surya Kumar Yadav Caption In Talk: सोशल मीडियावर सध्या मिरा राजपूतने पोस्ट केलेल्या या सेल्फीची जोरदार चर्चा असून त्यावर सुर्यकुमार यादवनेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 9, 2024, 02:33 PM IST
'आता आमच्या मुलाला आम्ही फार..', शाहिदच्या बायकोचा सुर्यकुमारबरोबरचा सेल्फी Viral; सूर्याचा भन्नाट रिप्लाय title=
मिराने पोस्ट केलेला फोटो सध्या तुफान चर्चेत आहे

Mira Rajput Shahid Kapoor Selfie With Surya Kumar Yadav Caption In Talk: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मिरा राजपूत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या शाहीदच्या पत्नीने पोस्ट केलेली एक इन्स्टा स्टोरी केवळ मनोरंजनसृष्टीमध्येच नाही तर क्रिकेट विश्वातही चर्चेत असल्याचं दिसत आहे. खरं तर मिराने पोस्ट केलेला हा चर्चेतील फोटो देशामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानांची धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या संगीताच्या कार्यक्रमातील आहे. या फोटोमध्ये हे सेलिब्रिटी जोडपं भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा स्फोटक फलंदाज सुर्यकुमार यादव आणि त्याच्या पत्नीबरोबर दिसत आहे. मिराने या फोटोला दिलेली कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

या फोटोत काय आहे?

मिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेला फोटो शनिवारी रात्रीचा आहे. हा सेल्फी शाहीदने काढल्याचं दिसत आहे. या फोटोमध्ये सर्वात डावीकडे शाहीद, उजवीकडे मिरा आणि या दोघांच्या मध्ये सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी दिविशा शेट्टी दिसत आहे. हे चौघेही कॅमेराकडे पाहून स्माइल देताना दिसत आहेत. मिराने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिच्या मुलाची पहिली प्रतिक्रिया काय होती हे सूचित केलं आहे. 

मिराने काय कॅप्शन दिली? सूर्याचा आला रिप्लाय

"आता आमच्या मुलाला आम्ही फार कूल आहोत असं वाटतंय," अशी कॅप्शन मिराने या फोटोला दिली आहे. सूर्यकुमारनेही मिराने त्याला आणि त्याच्या पत्नीला टॅग करुन पोस्ट केलेला हा फोटो रिशेअर करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "हाहा... लवकरच त्याला (तुमच्या मुलाला) भेटण्यासाठी उत्सुक आहे," असं सुर्यकुमार हा फोटो शेअर करत म्हणाला आहे. 

सुर्यकुमारची भन्नाट कामगिरी

सुर्यकुमारने नुकत्याच अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये 8 सामन्यांमध्ये 199 धावा केल्या. त्याने 28.42 च्या सरासरीने या धावा केल्या असून यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. सुर्यकुमारने त्याच्या फिल्डींगच्या माध्यमातूनही भारताच्या अनेक विजयांमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. 

नक्की पाहा >> अनंत अंबानींच्या लग्नात ठाकरेंचा डान्स! 'बन्नो की सहेली..' गाण्यावरील परफॉर्मन्सचा Video Viral

अनेक सेलिब्रिटींची हजेरी

दरम्यान, अनंत आणि राधिका यांच्या संगीत सोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये मनोरंजन क्षेत्राबरोबरच क्रिडा क्षेत्रातील अनेकजणांचा समावेश होता. यात प्रामुख्याने सलमान खान, माधुरी दिक्षित, दिक्षा पटाणी, मोनी रॉय, अनन्या पांडे, सोनम बाजवा, महेंद्र सिंह धोनी, विद्या बालन, सोनाली बेंद्रे, वरुण धवन, अटली यासारखे सेलिब्रिटींचा समावेश आहे.