मुंबई विरुद्ध सामन्याआधी CSK ला धक्का, स्टार खेळाडू टीममधून बाहेर

कॅप्टन रवींद्र जडेजाचं वाढलं टेन्शन, खासगी कारणामुळे मध्येच सोडलं IPL?

Updated: Apr 21, 2022, 11:55 AM IST
मुंबई विरुद्ध सामन्याआधी CSK ला धक्का, स्टार खेळाडू टीममधून बाहेर title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 33 वा सामना चेन्नई विरुद्ध मुंबई होत आहे. या सामन्याआधी चेन्नईचं टेन्शन वाढलं आहे. दीपक चाहर पाठोपाठ आता आणखी एक स्टार खेळाडू टीममधून बाहेर झाला आहे. खासगी कारणामुळे त्याने बायोबबल सोडल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कॅप्टन रवींद्र जडेजाचं टेन्शन वाढलं आहे. 

चेन्नई टीममध्ये दीपक चाहर पाठोपाठ आता डेवॉन कॉन्वे टीममधून बाहेर पडला आहे. डेवॉन आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याने तो टीममधून बाहेर पडला आहे. मुंबई विरुद्ध सामन्याआधी तो टीममधून बाहेर पडल्याने रविंद्र जडेजाच्या डोकेदुखीमध्ये वाढ झाली आहे. 

डेवॉन कॉन्वेनं आयपीएल सोडलं का असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र डेवॉननं काही वेळासाठी ब्रेक घेतला आहे. तो 25 एप्रिलपर्यंत पुन्हा टीमसोबत जोडला जाईल असं सांगितलं जात आहे. 

डेवॉननं एकच सामना खेळला मात्र त्यातही त्याला विशेष कामगिरी करण्यात यश आलं नाही. आज मुंबई विरुद्ध सामना होणार आहे. या सामन्यात चेन्नईला जिंकावं लागणार आहे. आतापर्यंत 6 पैकी केवळ 1 सामना जिंकण्यात चेन्नईला यश आलं आहे. 

मुंबई टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन:  रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, कायरन पोलार्ड, फॅबियन एलन, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ.

चेन्नई टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रुतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोइन अली, अंबाती रायडू, शिवम दूबे, एमएस धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (कर्णधार), ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्रावो, महेश थीक्षाना आणि मुकेश चौधरी