'या' बीसीसीआय अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

'मी टू'चं वाटळ आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळापर्यंत पोहचलय.

Updated: Oct 13, 2018, 06:39 PM IST
'या' बीसीसीआय अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप  title=

मुंबई : 'मी टू'चं वाटळ आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळापर्यंत पोहचलय. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावरही महिला पत्रकारांनं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान लेखिया हरनिध कौर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या पत्रकाराचं नाव उघड न करता याबाबत वाचा फोडली आहे. नोकरीचं आश्वासन देऊन जोहरी यांनी या पत्रकाराचं शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय.

मलिंगावर आरोप

तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर देशभरात METOO ही मोहीम सुरु झाली. याअंतगर्त अनेक बड्या सेलिब्रिटींनी त्यांच्यावरही अत्याचार झाल्याचे आरोप केले. यानंतर आता याचं लोण क्रिकेटमध्येही पसरू लागलं आहे.

श्रीलंकेचा क्रिकेटपटू लसिथ मलिंगावरही लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत.

भारतीय गायिका चिन्मयी श्रीपदानं महिलांसोबत झालेल्या अत्याचारांच्या मुद्द्यावरून लसिथ मलिंगावर आरोप केले आहेत.

एका पीडित महिलेचा आवाज उठवत श्रीपदानं मलिंगावर आरोप केले आहेत.

आयपीएल सामन्यादरम्यान मलिंगानं हॉटेलच्या रुममध्ये एका मुलीवर जबरदस्ती केल्याचा दावा श्रीपदानं केला आहे.

'मी देखील शिकार'

बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा हिनंही आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल ME TOO या मोहिमेअंतर्गत खुलासा केलाय. बॅडमिंटन संघटनांमध्ये अध्यक्ष झाल्यानंतर एका व्यक्तीनं आपल्याबरोबर गैरव्यवहार केल्याचं ज्वाला गुट्टानं ट्विटद्वारे सांगितलय.

या व्यक्तीमुळे आपली कारकीर्द संपल्याचंही ज्वालानं म्हंटलय.

मी मानसिक छळाबाबत बोलत असले तरी तो छळच असल्याचं तिचं म्हणणं आहे.  संबंधित व्यक्ती संघटनेची अध्यक्ष झाल्यावर त्या व्यक्तीनं आपल्याला राष्ट्रीय संघातून बाहेर काढलं.

रियो ऑलिम्पिक खेळून आल्यानंतर पुन्हा आपल्याला राष्ट्रीय संघातून बाहेर ठेवण्यात आलं.

त्यामुळे आपण खेळायचंच थांबवल्याचं ज्वाल गुट्टाचं म्हणणं आहे.