मॉस्को : शरीराची लवचीकता हा जिमनॅस्टिक या क्रीडाप्रकारातील महत्त्वाचा घटक. पण, लवचीक लवचीक म्हणजे तरी किती? या प्रश्नाचे उत्तर आपणास तेव्हाच मिळते जेव्हा आपण जिमनॅस्टिकपटू ज्लैटाला भेटतो. ज्लाटा ही रशीयातील जीमनॅस्टीक खेळाडू आहे. तिची लवचीकता पाहून जगभरातील अनेक लोक तोंडात बोट घालतात.
जगातील सर्वात लवचीक खेडाळू म्हणून तिची ओळख आहे. तिच्या लवचिकतेचा अनेक ठिकाणी विक्रम ठरला आहे. इतका की तिच्या लवचिकतेची नोंद घेण्यासाठी अधिकारी येत तेव्हा तेसुद्धा आश्चर्यचकीत होत. आपल्या लवचीकतेसाठी ज्लाटाने कठोर परिश्रम घेतल्याचेही सांगितले जाते. तिच्या या लवचिकतेची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली आहे.
सध्या वय वर्षे 31 असलेली जूलीया उर्फ ज्लाटाचे शरीर एखाद्या रबरापेक्षा मुळीच कमी नाही. तिचे वैशिष्ट्य असे की, आपल्या शरीराला ती कुठून कुठेही आणि कसेही दुमडू शकते. जगातील सर्वाधीक लवचिक महिलेचा विक्रमही तिच्या नावावर आहे.
ज्लाटाच्या लवचिकतेमागचे गुपीत शोधण्यासाठी डॉक्टरांनीही तपासणी केली. पण, डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. ज्लाटाच्या शरीरातील हाडे ही नुकत्याच जन्मलेल्या लहान मुलासारखी असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे.